पुणे : कल्याणीनगर परिसरात महापालिकेने ड्रेनेजवर बसविलेली लोखंडी जाळी असलेली चेंबर्सची झाकणे चोरणा-या तिघांना येरवडा पोलिसांनी अट्क केली. नीलेश विलास पवार (वय २२, लक्ष्मीनगर, येरवडा), सुरेश अनिल पाटोळे (वय ३१) आणि एका ३५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.
महापालिकेने ड्रेनेजवर बसविलेली लोखंडी जाळी असलेली झाकणे अज्ञात व्यक्तींनी चोरल्याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई अनिल शिंदे व पोलीस नाईक अमजद शेख यांना आरोपी हे आगाखान पुलाजवळ कल्याणीनगर येथे एका रिक्षातून चोरी केलेली चेंबर्सची झाकणे कुठेतरी घेऊन जाणार आहेत, अशी माहिती मिळाली. तपास पथकाने आरोपी पळून जात असताना त्यांना पकडले. त्यांच्याकडे २ लोखंडी चेंबर्सची झाकणे मिळाली. ही झाकणे त्यांनी कल्याणीनगर भागातून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांनी कल्याणीनगर भागात एकूण ६ लोखंडी चेंबर्सची झाकणे व चोरी करण्यासाठी वापरलेली ५० हजार रुपये किमतीची एक रिक्षा असा एकूण ८६ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, समीर करपे, पोलीस नाईक अमजद शेख, पोलीस शिपाई अनिल शिंदे, सहायक पोलीस फौजदार प्रदीप सुर्वे, पोलीस हवालदार गणपत थिकोळे, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, पोलीस नाईक गणेश वाघ, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस शिपाई राहुल परदेशी, अजित वाघुले, पोलीस शिपाई स्वप्निल मराठे, पोलीस शिपाई गणेश शिंदे, मपोशि वर्षा सावंत यांनी ही कामगिरी केली.
----------------------------------------------------