धायरी: वडगाव खुर्द येथील राजयोग सोसायटी परिसरातील ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेविका राजश्री नवले यांच्या निधीतून हे काम केले जात आहे.
याप्रसंगी नगरसेविका राजश्री नवले, खडकवासला मतदारसंघचे अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस सारंग नवले, तसेच परिसरातील सोसायट्यांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजयोग सोसायटी परिसरात इतर सोसायट्या तसेच लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरात पूर्वीची असणारी ड्रेनेज लाईन ही आकाराने लहान असल्याने तसेच पावसाळ्यात काही सोसायट्याच्या टाक्यांमध्ये ड्रेनेजमधील पाणी शिरत असल्याने नागरिकांनी मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईन करण्याची मागणी स्थानिक नगरसेविकेकडे केली होती. नवले यांनी नागरिकांच्या मागणीचा विचार करून या परिसरात ड्रेनेज लाईन करण्यासाठी पाठपुरावा करून ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. राजयोग सोसायटी ते वडजाई माता मंदिर या परिसरात १८ इंच व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.
----------------
फोटो ओळ: ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन करताना भीमराव तापकीर, नगरसेविका राजश्री नवले,बाळासाहेब नवले व इतर.