पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे काम चांगले असताना चांदणी चौकाच्या कामाला काय दृष्ट लागली कळायला मार्ग नाही असा सवाल करतानाच चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा. गडकरी यांची वेळ घेऊन हा विषय मी मांडणार आहे. चांदणी चौकात पादचाऱ्यांचा विचार या ठिकाणी केला गेलेला नाही. अपघात व्हायची वाट का बघत आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
चांदणी चौकांच्या पुलाची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकाराशी बोलत होत्या. काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोपान काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, पुणे शहर युवकाध्यक्ष किशोर कांबळे, कुणाल वेडे पाटील, किरण वेडे पाटील, महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, संसदेचे अधिवेशनापूर्वी मी नितीन गडकरी यांची भेट घेईल, हा प्रकल्प जेव्हा सुरु केला गेला तेव्हा पादचाऱ्यांचा विचार या ठिकाणी केला गेलेला नाही. बारामती लोकसभा मतदारसंघ शून्य अपघात करण्याचा आमचां मानस आहे. यात राजकारण कुठे ही करु नये .
अजित पवार खरोखरच डेेंग्यूने आजारी होते
उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूने आजारी होते. आरोग्याच्या बाबतीत राजकारण करू नये. आजार होतो तेव्हा माणसाने आराम करायचा असतो. मला माहिती आहे. अजित दादांना आरामाची गरज आहे. आरोग्यमध्ये राजकारण आणणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. हे माझं वैयत्तीक मत आहे. दादांची चौकशी रोजच करते. बर झाल्यावर मी त्याला भेटायला जाणार आहे. शेवटी तो माझा भाऊ आहे, असे सांगत त्यांनी अजित पवार यांचा आजार राजकीय नव्हता, हे स्पष्ट केले.मात्र ते आजारातून बरे झाल्यावर आपण त्यांना भेटायला जाऊ असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
कोणत्याही आईला आपल्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं अस वाटतं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी माझ्या देखतच अजितने राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, ही माझी इच्छा आहे, असं त्या म्हणाल्या. त्याबाबत विचारले असता सु्प्रिया सुळे म्हणाल्या, अर्थातच कोणत्याही आईला आपल्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं.