पुणे : गव्हाचे शेकडो दाणे, काळा मसाला, मीठ, साबुदाणा वापरुन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य रेखाचित्र सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे साकारले. सुमारे ९६ किलो गहू वापरुन केलेल्या रेखाचित्राच्या माध्यमातून अटलजींचे स्मरण केले. चित्रयज्ञाच्या माध्यमातून सलग १२ तास अनेकांनी विविध चित्रेही साकारली. हे चित्र रेखाटण्यासाठी साडेतीन तास लागले.
निनाद पुणे, निनाद पतसंस्था आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ९६ किलो गहू वापरुन अटलजींचे भव्य रेखाचित्र सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे साकारले. यावेळी निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, अॅड.वैजनाथ विंचूरकर, रामलिंग शिवणगे, अशोक कुलकर्णी, शुभदा जोशी, विद्या शाळीग्राम, हेमंत पानकर, कलातीर्थचे अमोल काळे, महेश कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, स्वामिनी कुलकर्णी, अनुश्री काळे उपस्थित होते. कलातीर्थचे अमोल काळे यांनी हे चित्र साकारले.
सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथून अटलजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे चित्र रेखाटून १०० किलो गहू वंचित विकास संस्थेला दिला. चित्रांच्या माध्यमातून देखील अटलजींना आदरांजली अर्पण केली. ती चित्रे भारतीय जवानांना सैनिक मित्र परिवारातर्फे पाठवणार आहेत. कार्यक्रमाची सांगता सैनिक परिवारांतील सदस्यांच्या हस्ते दीपोत्सवाने करण्यात आली.
फोटो ओळी : निनाद पुणे, निनाद पतसंस्था आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ९६ किलो गहू वापरुन अटलजींचे भव्य रेखाचित्र सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे साकारले. कलातीर्थचे अमोल काळे यांनी हे चित्र साकारले.