शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

इंदापूरच्या सूर्यमंदिराचे स्वप्न अपूर्णच राहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 2:16 AM

उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यूजी महाराज यांनी सन २०००मध्ये इंदापूरमधील कनुभाई पटेल यांच्या घराजवळील जागेत सूर्योदय परिवार नावाने सेवाश्रमाची स्थापना केली. या जागेत भय्यूजी महाराज यांनी नदीच्या कडेला डोंगरमाथ्यावर भव्यदिव्य सूर्यमंदिर उभारण्यासाठी कामाला सुरुवात केली होती.

इंदापूर  -  उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यूजी महाराज यांनी सन २०००मध्ये इंदापूरमधील कनुभाई पटेल यांच्या घराजवळील जागेत सूर्योदय परिवार नावाने सेवाश्रमाची स्थापना केली. या जागेत भय्यूजी महाराज यांनी नदीच्या कडेला डोंगरमाथ्यावर भव्यदिव्य सूर्यमंदिर उभारण्यासाठी कामाला सुरुवात केली होती. मंदिराचा आराखडा बनवून फाउंडेशनपर्यंत मंदिराचे काम करण्यात आले आहे. त्यानंतर काही कारणांनी मंदिराचे पुढील काम होऊ शकलेले नाही. सूर्यमंदिर निर्माण करणे हे त्यांचे आयुष्यातील महत्त्वाचे स्वप्न होते; परंतु ते अधुरेच राहिले.२००८ पर्यंत आश्रमाचे काम पटेल यांच्या जागेत चालू होते. आश्रमासाठी २००८मध्ये इंदापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक गोरख शिंदे यांनी त्यांच्या मालकीची ५ गुंठे जमीन राधाकृष्ण अपार्टमेंट, पडस्थळ रोड या ठिकाणी दिली. या जागेत मोठा सभामंडप व आतमध्ये नाथमहाराजांची गादी व शेजारी भय्यूजी महाराज यांची गादी आणि पुढे प्रशस्त सभामंडप अशा पद्धतीने आश्रमाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी इंदापूर व परिसरातील सर्व भक्तगण सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांची सेवा करतात. वर्षातून ६ ते ७ वेळा भय्यूजी महाराज इंदापूरला भक्तगणांना दर्शन देण्यासाठी येत असत.इंदापूरपासून १० किलोमीटरवर सोलापूर-पुणे महामार्गालगत असणारे मौजे हिंगणगाव या ठिकाणी भीमा नदीच्या काठावर पूर्वी जुने हिंगणगाव वसले होते; परंतु उजनी धरणाची निर्मिती झाल्यानंतर या हिंगणगावाचे स्थलांतर झाले. पुणे-सोलापूर महामार्गाच्या पलीकडे डोंगरमाथ्यावर ते गाव वसले. त्यामुळे जुन्या हिंगणगाव गावठाणाची २२ एकर जागा गाव समितीने ठराव करून भय्यूजी महाराज यांच्या सूर्योदय परिवार ट्रस्टला बक्षीसपत्र म्हणून देण्यात आलेली आहे. या जागेत भय्यूजी महाराजांनी नदीकाठी डोंगरमाथ्यावर भव्यदिव्य सूर्यमंदिर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र, मंदिराचे पुढील काम होऊ शकलेले नाही.सध्या सूर्यमंदिराच्या जागेत सूर्योदय परिवार इंदापूरच्या वतीने देशी गार्इंची शाळा चालविली जात आहे. सध्या या शाळेत ४० पेक्षा जास्त गार्इंचे संगोपन करण्यात येत आहे.त्यांना वैरण व चारा यासाठी लागणारा सर्व खर्च भक्तगण वर्गणी जमवून करीत असल्याची माहिती भय्यूजी महाराजांचे इंदापुरातील निकटवर्ती भक्त प्रदीप पवार, सतीश कस्तुरे व रवींद्र माने यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेBhayyuji Maharajभय्यूजी महाराज