शिवाजी गोरे पुणे : गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कुलसारख्या मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी स्पर्धेला जाण्यापूर्वी पाहिले होते आणि त्या स्पर्धेत दोन सुवर्ण (महिला एकेरी व सांघिक), एक रौप्य (महिला दुहेरी) व एक कांस्यपदक (मिश्र दुहेरी) जिंकून मी ते पूर्णही केले. राष्ट्रकुल स्पर्धेतील माझ्या कामगिरीवर मी समाधानी असल्याचे भारताची अव्वल आाणि जागतिक क्रमवारीत ५८ व्या क्रमांकावर असलेली टेबल टेनिसपटू मनिका बत्राने लोकमतला सांगितले. पुण्यातील इंडिया खेलो या टेबल टेनिस अॅकॅडमी येथे मनिका तेथील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आली असता मनिका यांनी वरील वक्तव्य केले. मनिका म्हणाली, राष्ट्रकुल स्पर्धेला जाण्यासाठी पूर्वी गुप्तासरांकडून योग्य मार्गदर्शन झाले होते. महिला एकेरीत जेव्हा मी जागतिक क्रमवारी चौथ्या क्रमांकावर असलेल्या सिंगापूरच्या यूला जेव्हा मी पराभूत केले केले तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर माझ्यासह भारतीय महिलांनी आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून त्या स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले. संघातील प्रत्येक खेळाडूने आपले योगदान योग्य प्रकारे दिल्यामुळेच आम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखू शकलो. राष्ट्रकुलमधील इतर देशांच्या अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळताना आम्ही रणनिती आखून नियोजन करायचो. त्याच्या खेळचे विश्लेषण केले जायचे आणि मग आमच्या खेळाची रणनिती ठरविण्यात येत होती. आगामी स्पर्धांबाबत विचारले असता मनिका म्हणाली, सध्या मी पुण्यात यूटीटी स्पर्धेसाठी तयार आहे. ही स्पर्धासुद्धा मोठी आहे, यामध्ये परदेशी खेळाडूसुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळून आपल्यामधील काही चुका असतील तर त्या सुधारण्याची संधी मिळणार आहे. याच बरोबर तंदूरूस्तीवर (फिटनेस) सुध्दा मी जास्त लक्ष देत आहे. कारण टेबल टेनिस हा खेळ जलद आहे आणि जागतिक स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना जर पराभूत करायचे असले तर तंत्रासह तंदूरूस्तीसुध्दा महत्वाची आहे. इंडिया खेलो या खेळाकडून सुरू केलेल्या अॅकॅडमीबाबत विचारले असता, मनिका म्हणाली, या आंतरराष्ट्रीय प्रकाराच्या अॅकॅडमी भारतात सर्व ठिकाणी असायला हव्यात, त्यामुळे भारतातून अव्वल दर्जाचे टेबल टेनिस खेळाडू तयार होऊ शकतील.
गोल्ड कोस्टमध्ये गोल्ड जिंकण्याचे स्वप्न पूर्ण : मनिका बत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 8:03 PM
जागतिक स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना जर पराभूत करायचे असले तर तंत्रासह तंदूरूस्तीसुध्दा महत्वाची : मनिका बत्रा
ठळक मुद्देआगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी उत्सुक, सराव योग्य दिशेने आंतरराष्ट्रीय प्रकाराच्या अॅकॅडमी भारतात सर्व ठिकाणी असायला हव्या