लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेल्या कपडे न घालता, आपण पुणे महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून नागरिकांना सामोरे जात आहोत याचे भान सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवावे. असे खडे बोल सुनावणीत महापालिका प्रशासनाने, महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या 'हिरोगीरीला ' चाप लावला आहे. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या सेवकांना 'जीन्स पॅन्ट व टी शर्ट ' घालता येणार नाही. तर महिला कर्मचाऱ्यांनाही साडी, सलवार- कुर्ता परिधान करूनच कामावर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, याची अंमलबजावणी होते की नाही याची जबाबदारी प्रत्येक खाते प्रमुख, विभाग प्रमुख व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पुणे महापालिकेत दररोज लोकप्रतिनिधी, विविध संस्थाचे प्रतिनिधी, उच्च पदस्थ अधिकारी व सर्व सामान्य नागरिक येत असतात. अशावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी हे महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून संवाद साधतात. अशावेळी त्यांची वेशभूषा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून पहिला जातो. तर संबंधिताच्या वेशभूषेवरून ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची छाप भेट देणाऱ्या व्यक्तीवर पडत असते. यामुळे महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या व्यक्तीला सामोरे जाताना, आपली वेशभूषा किमान शासकीय कामास शोभेल अशी असेल याची सर्वांनी काळजी घ्यावी. असे या आदेशात नमूद केले आहे.पुरुष सेवकांसाठी वेशभूषा ( ड्रेस कोड)आवश्यक :- शर्ट पॅन्ट / ट्राऊझर पॅन्ट : बूट, सॅंडलमनाई :- जीन्स - टी शर्ट, स्लीपरमहिला सेवकांसाठी ( ड्रेस कोड)आवश्यक : साडी, सलवार- कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्टमनाई : अन्य फॅशनेबल पेहराव, चित्रविचित्र नक्षीकाम व चित्रे असलेले ड्रेस, स्लीपरआठवड्यातून एकदा खादी वापरा ! खादीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी किमान एक दिवस तरी खादी कपड्याचा पेहराव करावा ( गणवेश नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.ओळखपत्र अनिवार्यकार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करणे यापुढे अनिवार्य करण्यात आले आहे.पेहराव नीटनेटका व स्वच्छ असावा महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना पेहरावाबाबत सूचना देतानाच, हा पेहराव नीटनेटका व स्वच्छच असावा असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर ड्रेस कोड हे महापालिकेच्या नियमित सेवकांसह, कंत्राटी कामगार, व्यवसायीक सल्लागार यांनाही कार्यालयीन वेळेत लागू राहणार आहे. याची अंमलबजावणी होते की नाही याची खबरदारी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे