पुणे शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच अनेक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांना वयोमानानुसार अथवा शारीरिक हालचालींना मर्यादा येत असल्याने केंद्रावर जाऊन लस घेणे अडचणीचे ठरू शकते. तसेच लसीकरणास आवश्यक प्रक्रिया पार पाडून लस मिळेपर्यंत लागणारा वेळ लक्षात घेता, अनेक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांना ही प्रक्रिया गैरसोयीचे ठरू शकते. मुंबई महापालिकेने राबविलेल्या उपक्रमानुसार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती वाहनातून थेट लसीकरण केंद्रावर येतात व गाडीत बसूनच त्यांना लस दिली जाते. याच धर्तीवर पुणे महापालिकेने अशी सुविधा सुरू करावी, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील केली आहे.
ड्राइव्ह इन लसीकरण सुरू करावे - आमदार चेतन तुपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:10 AM