शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

प्रवाशांवर दादागिरी करणारे वाहक, चालक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 3:50 AM

पीएमपी प्रवाशाची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी हद्दीचा वाद घालून त्याला शिवीगाळ करणाऱ्या सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भागवत बडे यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. याबाबतची चौकशी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांना दोन दिवसांत अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.

पुणे - पीएमपी प्रवाशाची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी हद्दीचा वाद घालून त्याला शिवीगाळ करणाऱ्या सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भागवत बडे यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. याबाबतची चौकशी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांना दोन दिवसांत अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. पीएमपीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रवाशांवर दादागिरी करणाºया चालक, वाहकास पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी निलंबित केले आहे़चंद्रकांत भिकोबा पवार (चालक), सौरभ बबन पवार (वाहक) अशी निलंबित कर्मचाºयांची नावे आहेत़ स्वारगेट ते कात्रजदरम्यान पीएमपीच्या रातराणी बसमधून हनुमंत पवार आणि त्यांचे कुटुंबीय प्रवास करीत होते़ महिलांच्या जागेवर काही पुरुष बसले होते़ पवार यांनी वाहक सौरभ पवार यांना पुरुषांना उठवून महिलांना बसायला जागा करून द्यावी, अशी विनंती केली़ तेव्हा पवार यांनी आपल्याला तेवढेच काम आहे का, असे सांगून ते तिकीट काढण्यात मग्न राहिले़ त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून त्याची माहिती दिली. बस पोलीस ठाण्यात न्या, असे सांगितल्यावर वाहकाने त्यांना शिवीगाळ करीत बसमधून खाली उतरविले़ कुटुंबीय बसमध्ये असताना बस तशीच घेऊन निघून गेले़ पोलिसांनी हद्दीचा वाद घातला़ त्यानंतर पोलिसांनी त्यांना सहकारनगर पोलीस ठाण्यात नेले़ तेथे पोलीस उपनिरीक्षक बडे यांनी पवार यांना शिवीगाळ केली़ मध्यरात्रीनंतर त्यांची तक्रार घेऊन वाहक सौरभ पवार यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली़ हनुमंत पवार यांच्यावरही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली़या घटनेची पोलीस आणि पीएमपी प्रशासनाने गंभीर दखल घेतली़ पोलीस उपायुक्त डॉ़ प्रवीण मुंढे यांनी सांगितले, की पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची प्रवासी हनुमंत पवार यांनी भेट घेऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली़ त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़ सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांना दोन दिवसांत चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश दिला आहे़आरक्षित जागेवर महिलांचा हक्कमध्यरात्री घडलेल्या या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघाही कर्मचाºयांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे़ त्यांची चौकशी केली जाईल़ पीएमपीमध्ये प्रवास करीत असताना डावी बाजू महिलांसाठी राखीव असते़ अशा जागेवर बसण्याचा महिलांचा हक्क आहे़ याबाबत कोणी पुरुष प्रवासी जर महिलांची अडवणूक करीत असेल तर पीएमपीच्या वाहकांनी महिलेला मदत करणे गरजेचे आहे़ - नयना गुंडे, व्य. संचालिका, पीएमपीवाहकावर गुन्हा दाखल : प्रवाशाला शिवीगाळ केल्याप्रकरणी सहकानगर पोलिसांनी पीएमपी वाहक सौरभ पवार (वय ३०, रा़ दत्तनगर, जांभुळवाडी, कात्रज) याच्याविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला़ पवार यांनी वाद घालून हनुमंत पवार यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या हातातील मोबाईल पाडून १ हजार रुपयांचे नुकसान केले़ सार्वजनिक ठिकाणी त्यांना अश्लील शिवीगाळ करून अपमान केला. या प्रकरणात अगोदर पोलिसांनी हनुमंत पवार यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता़महिला आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी व्हावीपीएमपी बसमध्ये मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे महिला प्रवाशांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर पुरुष बसलेले असतात़ अशा वेळी वाहकाने आपली जबाबदारी ओळखून आरक्षित जागेवर महिलेला बसू न देणाºयांना विचारणा करून त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे़ जर महिलेला आरक्षित जागेवर बसू न देणारे लोक दांडगाई करत असतील तर अशा वेळी गाडी नजीकच्या पोलीस चौकीत नेणे अपेक्षित आहे़ पण तसे घडत नाही़ महिला प्रवासी आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांच्याकडे केली आहे़- डॉ. नीलम गो-हे, आमदार

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे