पुणे : ‘शहरात वाहने चालविताना रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी वाहने चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे. बीआरटी मार्गिकेतून खासगी वाहने चालवू नये व इतर वाहनचालक, पादचारी यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने वाहने चालविण्याचे आवाहन पीएमपीएमएलकडून सर्व वाहनचालकांना करण्यात येत आहे.
खासगी वाहनचालकांना आवाहन करण्यात येते की, बीआरटी मार्गिकेत अपघात होऊन काहींना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागते, तर काहींना प्राणास मुकावे लागते. त्यामुळे पीएमपीएमएल सर्व वाहनचालकांना आवाहन करते की, वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत. दुचाकीस्वारांनी सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, पीएमपीएमएलच्या वाहक व चालक सेवकांनी ही बस चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन करीत आहे.