इंदापूर : संपूर्ण भारतभर जय संघर्ष संघटना नेहमीच वाहनचालकांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करते. संघटनेला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असून, यातील चालकांनी राज्यातील हजारो लोकांना जीवदान देण्यामध्ये देशात सर्वात मोठा वाटा आहे, कोठेही दंगा झाल्यास अगोदर वाहनांना लक्ष केले जाते, त्यामध्ये वाहनचालकांना काही वेळा नाहक अन्यायाला बळी पडावे लागते, त्यामुळे या संघटनेच्या वाहनचालकांना लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन विमा संरक्षण देणार असल्याचे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेच्यावतीने आठ राज्यातील वाहनचालकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी देशातील अनेक राज्यांसह, महाराष्ट्र, इंदापूर, दौंड, बारामती विभागातील हजारो वाहनचालक महामेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. इंदापूर संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद मखरे, शहराध्यक्ष नीलेश वाकळे, उपाध्यक्ष संतोष रोकडे, परमेश्वर माखरे, किसन कडाळे, बाळासाहेब शिंदे, शकील बागवान, गंगाधर मिसाळ, बाळासाहेब हजारे, नीलेश चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक अभिजित अभंग, व्ही. पी. कदम, अलिबागचे पोलीस कॉन्स्टेबल महेश मांडवे उपस्थित होते.संघटनेने केलेल्या मागण्या योग्य असून, त्यामध्ये तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रातील लाखो वाहनचालक आहेत. त्यामुळे लवकर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यामध्ये वाहनचालकांनीदेखील स्वत:ची काळजी करून वाहन चालवताना नशापाणी करू नये.- हर्षवर्धन पाटीलमाजी सहकारमंत्री