शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

ग्रामीण भागातील महिलांना मिळणार ड्रायव्हिंग प्रशिक्षण

By admin | Published: June 10, 2017 1:54 AM

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनातून, १८ वर्षांवरील मुली आणि महिलांना मोफत चारचाकी वाहन चालवण्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनातून, १८ वर्षांवरील मुली आणि महिलांना मोफत चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील महिलांना चारचाकी वाहन शिकल्याने, स्कूल बस किंवा इतर कामे करता येणार आहेत. यासाठी पन्नास लाखांची तरतूद केल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या माजी सभागृहातील सदस्यांनी शेवटच्या सर्वसाधारण सभेमध्ये महिलांना वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना राबवावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना केली होती. या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेने नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असते. जिल्हा परिषदेने राबविलेल्या अनेक योजनांची राज्य सरकारनेदेखील वेळोवेळी दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने पुढच्या काळात ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी येत्या काळात योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार दुचाकीसाठी दीड हजार व चारचाकी वाहन प्रशिक्षणासाठी तीन हजार रुपये निधी महिलांना देणार आहे. स्कूल बस किंवा इतर प्रवासी वाहने चालवून महिला व्यवसाय करू शकणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेने ही योजनेचा निर्णय घेतला आहे.