शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

दुष्काळाच्या झळा : पुण्यात २५५ तर सोलापुरात ३०९ टँकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 9:00 AM

शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. मात्र, सूर्य चांगलाच तापला असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे.

ठळक मुद्देविभागात एक हजार टँकर ; १८ लाख नागरिक बाधित

पुणे : दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही भागात महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विभागातील दुष्काळी भागात जिल्हा प्रशासनातर्फे टँकरने पाणीपुरवठा केला जात असून सध्या पुणे जिल्ह्यात २५५ तर सोलापूर जिल्ह्यात ३०९ टँकर सुरू आहेत. विभागातील चार जिल्ह्यातील १८ लाख २५ हजार १३८ नागरिकांना आणि १४ लाख ४५ हजार ५४ पशुधनाला दुष्काळाचा फटका बसला आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. मात्र, सूर्य चांगलाच तापला असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. परिणामी राज्यात काही ठिकाणचे तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता अधिक जाणवू लागली आहे.मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनची चाहुल गालते. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनच्या आगमनाला विलंब होणार आहे. पाऊस लांबल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३०९, साताऱ्यात २६०, पुणे जिल्ह्यात २५५ आणि सांगलीमध्ये १९२ टँकरने दुष्काळ बाधितांना पाणी पुरवठा सुरू आहे. तर विभागातील टँकरची संख्या १,०१३ वर गेली आहे.साताºयातील एकट्या माण तालुक्यात १०९ टँकर सुरू असून सोलापुरातील मंगळवेढ्यात ५७, सांगोला येथे ५५ आणि करमाळ्यात ४९ टँकर सुरू आहेत. तसेच पुणे जिल्ह्यात बारामतीमध्ये ४० इंदापूरमध्ये ४२ आणि पुरंदर व शिरूरमध्ये प्रत्येकी २९ टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. विभागातील ८६६ गावांना आणि ५ हजार ४५ वाड्यांना दुष्काळा फटका बसला आहे.-- विभागातील टँकरची आकडेवारी :   पुणे : आंबेगाव २७, बारामती ४०, दौंड २४,हवेली १३, भोर ७, इंदापूर ४२, जुन्नर २१, खेड १३, पुरंदर २९, शिरूर २९, वेल्हा २, मुळशी ४.सोलापूर : सांगोला ५५, मंगळवेढा ५७, माढा २९, करमाळा ४९, माळशिरस १८, मोहोळ २३, दक्षिण सोलापूर २५, उत्तर सोलापूर १८, अक्कलकोट १४, बार्शी २०, पंढरपूर १.  सातारा : माण १०९, खटाव ४२, कोरेगाव ३६, फलटण ३६, वाई ७, खंडाळा २, पाटण ६, जावळी १३, महाबळेश्वर ४, सातारा २, कराड ३. सांगली : जत १०९, कवठेमहाकाळ १५, तासगाव १५, खानापूर १३,आटपाडी ३३,मिरज ५.

   

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळFarmerशेतकरीWaterपाणी