शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

दुष्काळाच्या झळांनी आटले पाणी : सात वर्षांनी प्रथमच ब्रिटीशकालीन धरणाचे दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 16:07 IST

वीर (ता.पुरंदर) धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटीशांनी बांधलेले धरण दिसु लागले आहे. गेले अनेक वर्ष धरण पाण्यात राहुनही जुने धरण आजही चांगल्या स्थितीत आहे.

राहुल वाघोलेपुणे (परिंचे)  : वीर (ता.पुरंदर) धरणातीलपाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटीशांनी बांधलेले धरण दिसु लागले आहे. गेले अनेक वर्ष धरण पाण्यात राहुनही जुने धरण आजही चांगल्या स्थितीत आहे. सात वर्षानंतर पुन्हा वर  आलेल्या हे जुने धरण पाहण्यासाठी नागरिक या ठिकणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.    १९२० ते १९२७ साली या धरणाची निर्मिती करण्यात आली होती. याच दरम्यानच्या काळात भाटघर धरण बांधण्यात आले. १९१३ साली भाटघर धरण बांधण्यास सुरुवात करण्यात आली. १९२८ साली हे धरण पूर्ण करण्यात आले. वीर धरणाची क्षमता कमी असल्याने या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याची  संकल्पना पुढे आली. नविन वीर धरणाचे बांधकाम १९६२ साली सुरू करण्यात आले. १९६४ साली हे धरण पूर्ण झाले. १९६७ साली या धरणातून कालव्याद्वारे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या धरणाच्या बांधकामा विषयावर परिसरातील अनेक जुन्या जेष्ठ नागरिकांनी मजूरी केली असल्याचे सांगतात. नीरा नदीवर १९९६ साली  नीरा देवघर धरण बांधण्यास सुरुवात करुन २००७ साली देवघर धरण पूर्ण करण्यात आले. जुने वीर धरण पहाताना पाणी अडविण्यासाठी धरणाचा घालण्यात आलेला बांध, धरणाचे दरवाजे, जुने जॅकवेल, जुने पावर हाऊस, धरणाचा डावा व उजवा कालव्या व्दारे करण्यात येणारी पाण्याची वितरण व्यवस्था, धरणावर व कालव्यावर जाण्यासाठीचे साकव पुल, कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था आदी ब्रिटिश कालीन धरणाचे अवशेष सुस्थितीत आजही सुस्थितीत आहेत. १९६२ साली या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. १९६४ मध्ये हे धरण पूर्ण करून १९६७ धरणातून पहिले आवर्तन कालव्याद्वारे सोडण्यात आले होते.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीDamधरण