पुणे : पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर 850 ग्रॅम आणि लोणावळ्याजवळ आणखी 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सखोल तपास करताना पुणेपोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कस्टम विभागाने जप्त केलेले ५ कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज आहेत. हे अंमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जाते. कस्टम विभागाची ही मोठी कारवाई आहे. याप्रकरणी ४ जणांना अटक केली असून नेमके हे अंमली पदार्थ हे कोणाला विकणार होते आणि कुठून आणले होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.