शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

ढोलताशा पथके जोमात; बँड कोमात! पारंपरिक कलाकारांवर उपासमारीची वेळ

By अजित घस्ते | Published: August 29, 2022 4:21 PM

परंपरागत बँड पथकांची जागा ढाेलताशा पथकांनी घेतल्याने पारंपरिक कलाकारांवर यंदाही उपासमारी ओढत असल्याचे कलाकार सांगत आहेत

पुणे : कोरोना संकटामुळे तब्बल दाेन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील गणेश मंडळे उत्सवाची तयारी करीत आहेत. असे असले तरी परंपरागत बँड पथकांची जागा ढाेलताशा पथकांनी घेतल्याने पारंपरिक कलाकारांवर यंदाही उपासमारी ओढत असल्याचे कलाकार सांगत आहेत.

पूर्वी गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत बँड पथकांना प्रचंड मागणी असायची. सध्या ही जागा ढोल पथकांनी बळकावली आहे. त्यामुळे शहरात ढोलताशा पथके वाढली असून, तुलनेने बँड पथके लुप्त होत आहेत. आजची स्थिती पाहता शहरात सध्या ६० ते ७० बँड पथके आहेत, तर २०० ते २५० ढोलताशा पथके आहेत. या ढोलताशा पथकांत सुशिक्षित तरुण आणि मुलींची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे.

काय आहे फरक

- बँड पथकांतील कलाकारांची संख्या १५ ते २० असून, या कलाकारांना पगार द्यावा लागताे.तर- ढोलताशा पथकांमध्ये मात्र उत्स्फूर्तपणे तरुण वर्ग माेठ्या संख्येने सहभाग घेतात. तसेच त्यांना मानधनाचीही अपेक्षा नसते.- मिरवणुकीसाठी ढाेल-ताशा पथक गणेश मंडळांकडून ताशी २५ हजार ते एक लाखापर्यंत मानधन घेतात.- याउलट बँड पथकाची स्थिती आहे, मानधनापेक्षा खर्च जास्त हाेत आहे. बँड पथकांना कलाकार जपणे, त्यांना पगार देणे अवघड होत आहे. कलाकारांचा पगार, त्यांच्या कलेला वाव मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे बँड पथकांची संख्या कमी होत चालली आहे.

बँड पथकांपुढील आव्हाने

- बँड पथकांकडून कलाकारांना रोजंदारीवर पगार दिला जातो. यांना सण-उत्सव काळातच मागणी असते. इतर वेळेत काम नाही.- लग्नसमारंभात सध्या वाजवण्यास परवानगी नाही. कलाकारांना वाव नाही, त्यामुळे कलाकार कमी होत आहेत. यासाठीचे कलाकार मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड या भागांतून येत आहेत.- सध्या मराठवाडा, विदर्भ भागांतील कलाकार बँड वाजवत आहेत. त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी गणेश मंडळांनी प्रयत्न केले पाहिजेत.

ढोलताशा पथके वाढत असल्याने बँड पथकांची मागणी कमी

गोविंदा बँड पथकाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असायची. सध्या शहरात ढोलताशा पथके वाढत असल्याने बँड पथकांची मागणी कमी होत आहे. कलाकारांचे हातावर पोट असते. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न येत आहे. याउलट स्थिती ढोलताशा पथकांची आहे. त्यांना मागणी चांगली आहे. विशेष म्हणजे त्यांना वाद्य वाजवणाऱ्यांना पगार द्यावा लागत नाही, आम्हाला मात्र कलाकारांना सांभाळावे लागते. - सुनील ओव्हाळ, गोविंदा बँडपथक, पद्मावती

शहरात फक्त ६० बँड पथके 

सध्या ढोलपथके वाढल्याने बँड पथकांची संख्या कमी होत आहे. शहरात फक्त ६० बँड पथके आहेत. गणेश आगमनापासून ते विसर्जनापर्यंत कामाच्या दर्जानुसार बँड पथकाला मागणी असायची. सध्या बँड पथके चालवणे अवघड झाले आहे. आमच्या बँडला कामाच्या दर्जानुसार मागणी आहे. - अमोद सोलापूरकर, प्रभात बँड

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवSocialसामाजिक