राजगुरुनगर: कामगार दिनाच्या आदल्या रात्री कामगारांना मारहाण झाली असल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे घडला आहे. या मारहाणीत २ कामगारांना बेदम मारहाण झाली असुन जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परप्रांतीय कामगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एकीकडे राज्यभर कामगारांना कामगारदिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात मात्र ठाकुर पिंपरी येथे शुभेच्छा ऐवजी मारहाण झाली आहे.याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, ,सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कंपन्या बंद आहे. ठाकुर पिंपरी (ता. खेड ) येथील एका कंपनीत परप्रांतीय काम कंपनी काम बंद असल्यामुळे तेथेच भाड्याने खोली घेऊन राहत होते. मात्र ( दि ३० ) मध्यरात्रीच्या सुमारास गावातील काही युवकांनी मंद धुंद अवस्थेत येऊन प्रांतीय कामगार राहत असलेल्या ठिकाणी येऊन ३ कामगारांना हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन बेदम मारहाण केली. त्यामध्ये काही जणांच्या हाताला पायाला जखमा झाल्या आहेत. तसेच मंदधुद अवस्थेतील टोळक्यांनी कामगारांच्या राहत्या खोलीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटना घडल्यानंतर रात्रभर हे कामगार भीतीच्या वातावरणात घरातच बसले होते. आज सकाळी खोली सोडून आपआपले साहित्य घेऊन सुमारे ३०ते ३५ परप्रांतीय कामगार आडवाटेने हे गावाच्या दिशेने निघाले होते. पुणे -नाशिक महामार्गावर येताच खेड पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. तसेच आम्ही जर पुन्हा जर या गावात गेलो तर आम्हाला मारहाण होईल, आम्ही जाणार नाही असा प्रवित्रा कामगारांनी घेतला. मात्र खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बडाख, गोपनीय विभागाचे संदिप भापकर यांनी त्यांची समजुत काढून दिलासा देऊन पुन्हा माघारी पाठविले तसेच मारहाण करणा?्या टोळक्यांमधील दोन नांवे कामगारांनी पोलिसांना सांगितली असुन त्यांची सखोल चौकशी करून ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे अश्वासन पोलिसांनी दिले.
खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे मद्यधुंद युवकांची परप्रांतिय कामगारांना बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 7:30 PM
एकीकडे राज्यभर कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात मात्र ठाकुर पिंपरी येथे कामगारांना मारहाण
ठळक मुद्देया घटनेमुळे परप्रांतीय कामगारांमध्ये भीती निर्माण