पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णीयांनी लोकांची फसवणूक केली. कट रचून हे गुन्हेगारी कृत्य केले आहे. एखाद्या खुनाच्या गुन्ह्यापेक्षा हे प्रकरण गंभीर आहे. पत्नी आणि मुलाच्या वेगवेगळ््या बँक खात्यांवर पैसे फिरवत त्यांनी कंपनीला फायदा मिळवून दिला. या गंभीर गुन्ह्याची पाळेमुळे खोलवर रुजल्याचा युक्तिवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सोमवारी केला. या खटल्याची पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात डी.एस. कुलकर्णी (डीएसके), हेमंती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी यांच्या जामीन तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी आणि अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांवरील गुन्ह्याविषयीचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्यावतीने करण्यात आला. कारागृहात असताना डीएसके आजारी असल्याचे वेळोवेळी सोंग घेत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची सूट देऊ नये, असे चव्हाण म्हणाले.
'डीएसकेंचा गुन्हा खुनापेक्षा गंभीर'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 2:27 AM