पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या १३ अलिशाना गाड्यांचा लिलाव मावळ प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी येत्या १५ फेबु्रवारीला जाहीर केले आहेत. या तेरा गाड्यांची एकूण किमंत २ कोटी ८६ लाख ९६ हजार ५५९ ऐवढी निश्चित करण्यात आली असून, या संदर्भांत जाहीर नोटीस देण्यात येणार आहे. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कुलकर्णी यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यास नुकतीच न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला परवानगी दिली आहे. डी. एस.कुलकर्णी यांच्याकडे एकूण २० वाहने असून,, त्यांपैकी १३ वाहनांचा लिलाव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार संदेश शिर्के यांनी हे लिलाव जाहिर केले आहेत. यामध्ये १३ गाड्यांमध्ये बीएमडब्लू, पोर्शे, टोयटो अशा अलिशान गाड्याचा देखील समावेळ आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये वाहनांचा सामावेश असून, गेल्या अनेक महिन्यांपासून ही महागडी वाहने एकाच ठिकाणी धूळ खात पडून आहेत. यामुळे ती खराब होऊन त्यांची किंमत कमी होण्याची शक्यता लक्षा घेऊन न्यायालयाने वाहनांचा लिलाव करण्यास परवानगी दिली आहे.--------------लिलाव होणा-या गाड्या व त्यांच्या किंमती पुढील प्रमाणेक्रमांक गाडीचे मॉडेल प्रस्तावित किंमत१) पोर्शे ७८ लाख १० हजार२) बीएमडब्ल्यू ८५ लाख ७० हजार३) आॅगस्टा २६ लाख ६४ हजार ५५९४) बीएमडब्ल्यू ४१ लाख ५) कॅमरी हायब्रीड १६ लाख ८७ हजार६) स्नट्रो १ लाख २० हजार७) क्वॉलिस २ लाख ५० हजार८) ईटिओेस् ४ लाख ३० हजार९) इनोव्हा ८ लाख ४७ हजार१०) इनोव्हा ४ लाख ५० हजार११) इनोव्हा ८ लाख ५० हजार१२) इनोव्हा ६ लाख १८ हजार१३) इनोव्हा ३ लाख
डीएसकेंच्या १३ अलिशान गाड्यांचा १५ फेब्रुवारीला जाहीर लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 7:39 PM
डी. एस.कुलकर्णी यांच्याकडे एकूण २० वाहने असून, त्यांपैकी १३ वाहनांचा लिलाव करण्यास परवानगी
ठळक मुद्देमावळ प्रांत अधिकाऱ्यांनी काढले लिलावाचे आदेशठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कुलकर्णी यांची मालमत्ता करण्यात आली जप्त