पुणे : गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या एकूण तेरा गाड्यांचा लिलाव करण्यात येणार होता. त्यापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. या कारणास्तव ती लिलावाव्दारे विकु नयेत. असा अर्ज सोमवारी डीएसके प्रकरणात बचाव पक्षाकडून येथील विशेष न्यायालयात करण्यात आला आहे.आठ वाहने शिरीष कुलकर्णी यांच्या नाही तर कंपन्यांच्या मालकीची आहे, हे लक्षात आल्यानंतर आम्ही अर्ज केला. वाहनांच्या मालकीबाबतचे कागदपत्रे सादर केल्याचे अॅड. राजोपाध्ये यांनी न्यायालयास सांगितले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी या अर्जास विरोध केला. संबंधित अर्ज शिरीष कुलकर्णी यांच्या नावाने करण्यात आला आहे. फौजदारी संहिता कायद्यामध्ये पुनर्विचार करण्याची तरतूद नाही. त्यामुळे आहे तोच आदेश न्यायालयाने कायम ठेवावा, असा युक्तिवाद अॅड. चव्हाण यांनी केला.लिलाव करण्यात येत असलेली काही वाहने डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीच्या आहेत, असे यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील 8 वाहने डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आत्ता सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही तर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाला आहेत. त्यामुळे हा लिलाव रद्द करावा किंवा संबंधित आठ गाड्या वगळून लिलाव करावा, अशी मागणी करणारा अर्ज शिरीष कुलकर्णी यांचे वकील प्रदीप राजोपाध्ये आणि आशिष पाटणकर यांनी विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात केला आहे. ही आठही वाहने आलिशान व महागडी आहेत. संपत्तीबाबत 20 हरकती अर्जडीएसकेच्या संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदविण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या होत्या. त्यानुसार या संपत्तीबाबत सुमारे 20 हरकती दाखल झाल्या आहेत. त्यात सांगली सरकारी बँक आणि ईडी यांची देखील प्रत्येकी एक हरकत आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक जप्त करण्यात आलेल्या 463 स्थावर आणि जंगम मालमत्ता विक्री करण्याबाबत जाहीर नोटीस काढण्यात आली आहे.
डीएसकेंच्या वाहन लिलावात नवा तिढा ;संपत्तीबाबत 20 हरकती अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 8:00 PM