पळसदेव : डाळज नं़ 3 (ता़ इंदापूर) येथील रस्ता ओलांडण्यासाठी बनविलेला यू-टर्न गेल्या पंधरा दिवसांत दोन जणांचा ‘कर्दनकाळ’ ठरला आह़े या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना दुचाकींना पंधरा दिवसांत दोन अपघात झाल़े वास्तविक याठिकाणी ‘भुयारी’ मार्गाची गरज आह़े
दोन्हीकडून सपाटबाजू असल्याने वाहने सुसाट वेगाने येतात़ अन् निष्पापांचे बळी जात आहेत़ त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत़ त्याचीच परिणती गुरुवारी रात्री झालेल्या अपघातावेळी दिसून आली़ अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्गच रोखून धरला़ तसेच भुयारी मार्ग कधी करणार, असा जाबही प्रशासनाला विचारला़
पुणो-सोलापूर महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर महामार्गालगतच्या गावांच्या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी किंवा येण्या-जाण्यासाठी यू-टर्नची निर्मिती करण्यात आली़ परंतु काही ठिकाणी दुचाकी बसेल एवढीसुद्धा जागा दोन्ही रस्त्यांच्या मधोमध नाही़ त्यामुळे जोर्पयत दोन्ही बाजूकडून वाहने येत नाहीत तेव्हाच रस्ता ओलांडावा लागतो़ अशाच यू-टर्नचीही डाळज नं़ 3 येथेही निर्मिती करण्यात आली आह़े मात्र, या ठिकाणी सतत अपघात घडू लागल्याने मृत्यूचा पॉइंट बनला आह़े गेल्या पंधरा दिवसांत दोघांना आपला जीव गमवावा लागला़ गुरुवारी रात्रीचीही घटना ताजी आह़े
रस्ता ओलांडण्यासाठी व ये-जा करण्यासाठी याठिकाणी भुयारी मार्गाची गरज आह़े लोकांचीही कित्येक दिवसाची मागणी आह़े मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने, गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात स्थानिक युवकाचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाल़े जवळपास 2क्क् हून अधिक ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता-रोको केला़ तसेच लोकांमध्ये आक्रमकपणा अधिक दिसून येत होता़ दोन्ही बाजूंकडे वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या़ याची माहिती भिगवण पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल़े त्यानंतर पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा झाली़ त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विनंती केल्याने मार्ग मोकळा झाला.
महामार्ग प्राधिकरण काही करत नाही?
वास्तविक पाहता अपघातांचे प्रमाण का वाढत आहेत़ अधिक अपघात होणारे ‘पॉइंट’ निश्चित करणो व त्याठिकाणी अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील़ याचा अभ्यास करणो गजरेचे आह़े याकामी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनी व पोलीस प्रशासन यांनी एकत्र येऊन अपघातांचे विचारमंथन करणो
गरजेचे आहे.
4या ठिकाणी सतत अपघात घडू लागल्याने मृत्यूचा पॉइंट बनला आह़े गेल्या पंधरा दिवसांत दोघांना आपला जीव गमवावा लागला़
4रस्ता ओलांडण्यासाठी व ये-जा करण्यासाठी याठिकाणी भुयारी मार्गाची गरज आह़े