कर्वेनगर : कोथरूडमधील शिवाजी पुतळा चौक परिसरात मागील अनेक दिवसांपासून अपघात वाढत असून, पोलीस आणि मनपा प्रशासनाला याबाबत काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. कोथरूडकडे जाताना या चौकातून नागरिकांना जावेच लागते. तसेच या चौकात शास्त्रीनगर, कोथरूड गावठाण आणि कर्वेनगरकडून नागरिक येत असतात. कर्वेनगरकडून किंवा कोथरूड गावठाणाकडून कर्वे पुतळ्याकडे वळताना नागरिक नियम पाळत नाहीत. यामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. अपघातप्रवण क्षेत्र लक्षात घेता कर्वे पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत वाहतूक नियमांना अनुसरून दुभाजक बसवावे तसेच वाहतूक पोलिसांची नेमणूक करून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अनधिकृत पार्किंग तातडीने हटवावे, अशी मागणी येथील कोथरूड गावकरी मंडळाने केली आहे. (वार्ताहर)
दुभाजक नसल्याने अपघात वाढले
By admin | Published: February 21, 2017 3:10 AM