बेल्हा : बेल्हा (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पालामधील भटक्या कुटुंबातील चार ते पाच जण एका अडलेल्या गर्भवतीला घेऊन उठत बसत पेट्रोलपंपापासून गावाकडे पायी निघाले होते. याच वेळी रात्री जेवण झाल्यानंतर थोडे पाय मोकळे करण्यासाठी निघालेल्या राहुल केदारी यांच्या ही बाब लक्षात आली. त्या महिलेस गाडीतही बसता येत नव्हते. राहुल यांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. दरम्यानच्या काळात रस्त्यालगतच्या आडोशाला ती महिला प्रसूत झाली.येथे शुक्रवारी थंडी जास्त होती. या थंडीत एक गर्भवती महिला वेदनांनी तळमळत नातेवाइकांसह रुग्णालयाकडे निघाली होती. दरम्यान याच वेळी या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर पाय मोकळे करण्यासाठी निघालेल्या राहुल केदारी यांच्या चटकन ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी रस्त्यावरील वाहन थांबवून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात सोडण्याची विनंती केली. मात्र त्या महिलेस गाडीतही बसता येणे शक्य नव्हते. त्यामुळे केदारी यांनी ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. तेथील कर्मचाºयांना संबंधित महिलेविषयी माहिती दिली.या वेळी राहुल केदारी यांनी गावातील काही तरुणांना माहिती दिली.वेदना जास्त होत असल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गर्भवती सोबतच्या इतर महिलांनी रस्त्यालगत केलेल्या आडोशाला ती प्रसूत झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याचे सांगण्यात आले.या ठिकाणी आलेल्या आरोग्य कर्मचाºयांनीतिची योग्य काळजी घेतली. या वेळी राहुल केदारी, रोहित भारती, श्रीनिवास गटकळ, भाऊ बांगर, योगेश शहा, दत्तात्रय संगमनेरकर, सूरज शिरतर, योगी डोळस या कार्यकर्त्यांनी ताबडतोब वाहनाची व्यवस्था करून माय-लेकींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
तरुणाच्या सतर्कतेमुळे गर्भवतीला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 2:10 AM