शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

अनास्थेमुळे जंगलाची होरपळ

By admin | Published: April 27, 2017 4:51 AM

चैत्र वणव्याची मालिका अजूनही कायम असल्याचे ढाकाळे येथील भीषण वणव्याने अधोरेखित केले. ऐन उन्हाळ्यात वणव्याने

डेहणे : चैत्र वणव्याची मालिका अजूनही कायम असल्याचे ढाकाळे येथील भीषण वणव्याने अधोरेखित केले. ऐन उन्हाळ्यात वणव्याने सुपेवाडीपासून (ता. खेड) ढाकाळे (ता. आंबेगाव) येथील घाटरस्त्यातील गर्द वनराई आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने हजारो सागवृक्ष होरपळले आहेत, तर शेकडो वृक्षांचे बुंधे जळालेल्या अवस्थेत आहेत. अचानक लागलेल्या या आगीत निसर्ग संपदेने नटलेला हा शेकडो हेक्टरचा परिसर काळाकुट्ट पडला आहे. ढाकाळे घाटात सागवान वृक्ष विपूल प्रमाणात असून वसंत ऋतूत सागाची पानगळ होते. हळूहळू पालापाचोळ्यांचा एक जाड थर तयार होतो. या परिसरात तापमानात फेब्रुवारी महिन्यापासूनच मोठी वाढ होत असल्याने हा थर सुकतो. जंगलात झाडांपासून तुटून पडलेले, कापलेले किंवा वाऱ्यामुळे उन्मळून पडलेली अनेक मोठी झाडे आणि फांद्या वाळलेल्या स्थितीत पडून राहतात. अशात जंगलाच्या एखाद्या भागात आग लागली, की, संपूर्ण जंगलच या आगीच्या विळख्यात येते. अशा आगीच्या तडाख्यात लाखमोलाची वनसंपदा नष्ट होते. परिसरात वेगाने वाढणारे तापमान, कोरडे वातावरण त्यामुळे ही आग जोरात पसरते. या झाडांचे बुंधे पेट्रोल टाकल्यासारखे वेगाने पेट घेतात आणि साधारणत: २० मीटर उंचीचे हे देखणे जंगल पाहता पाहता नष्ट होते. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या गवतामुळे वणवा आणखीनच भडकतो.पालापाचोळ्याखाली रहाणारे अनेक लहान-मोठे कीटक, साप व इतर शेकडो सरपटणारे जीव होरपळून निघतात. पानगळी ओसरल्यावर वसंत ऋतूमध्ये सर्व झाडांना नवी पालवी फुटते. ही हिरवी वनस्पती तृणभक्षी प्राण्यांचा आवडता आहार असते; परंतु, वणव्यामुळे जमिनीवरील हिरवे गवत, पानेसुद्धा कोमजली जातात. सांबर, चितळ, ससा व अन्य तृणभक्षी प्राण्यांचा आहार नष्ट होतो. नाइलाजाने ते स्थलांतर करतात. बरेचदा ते जीवही गमावून बसतात. भीमाशंकर अभयारण्य, सह्याद्रीच्या पश्चिम घाटावरील अशी छोटी छोटी जंगलं वनव्यांपासून संरक्षित करण्याची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)