शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:32 AM

बँकेची २८ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत ५ मार्चपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

पुणे : सदनिकेवर कर्ज घेतलेले असताना कर्जाची परतफेड न करता सदनिका परस्पर विकून बँकेची २८ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत ५ मार्चपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.समीर सुभाष रामगुडे (वय ४१, रा. शुक्रवार पेठ) असे कोठडीत वाढ करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजू उत्तमचंद भन्साळी (वय ४२), कैलास सोमनाथ कदम, राहुल सतीश कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ५८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. मार्च २०१६ ते २३ जानेवारी २०१९ या कालावधीत बँक आॅफ महाराष्ट्रच्या नारायण पेठ शाखेमध्ये ही घटना घडली.आरोपींनी धनकवडी येथील गिरिजाशंकर सहकारी गृहरचना संस्थेतील एका सदनिकेच्या खरेदीखत करारनाम्याच्या आधारे नारायण पेठेतील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेतून २२ लाख ९४ हजार ७४० रुपयांचे कर्ज घेतले. या रकमेची परतफेड न करता खरेदीखत करारनामा रद्द करून सदनिका परस्पर दुसऱ्याला विकून कर्जापोटी घेतलेले २२ लाख ९४ हजार ७४० आणि त्यावरील व्याज ५ लाख २८ हजार ३९२ अशी एकूण २८ लाख २० हजार १३२ रुपयांची बँकेची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.