उंडवडी कडेपठार: गेल्या पाच-सहा दिवसापासून उंडवडी कडेपठार, जराडवाडी, गोजुबावी, बऱ्हाणपुर, सोनवडी सुपे, उंडवडी सुपे तसेच आसपासच्या परिसरात दाट धुके,ढगाळ आणि दुषित वातावरण होत आहे. या वातावरणाच्या बदलामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, ज्वारी तसेच पालेभाज्या पिकांवर परिणाम होत असून पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे.
सकाळच्या वेळी दाट धुके तर,दिवसभरात कधी ढगाळ वातावरण तर कधी दमट उष्णता निर्माण होत आहे.यामुळे पिकांसह पालेभाज्यांवर मावा आणि करपा पडू लागला असुन पिकांची वाढ देखील खुंटली आहे.त्याच बरोबर दूषित वातावरणामुळे थंडी,ताप,सर्दी,डोकेदुखी अशा आजारांना नागरीकांना सामोरे जावे लागत आहे.यामुळे शेतकरी आणि नागरिक अडचणीत सापडले आहेत.दाट धुके व ढगाळ हवामान या वातावरणातील बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे.पिकावर रोगराईच्या प्रदूभार्वाची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. कोरोना महामारी,लॉकडाउन,चक्रीवादळ,अवकाळी पाऊस, शेतमालाची थंडावलेली बाजारपेठ यानंतर पुन्हा अवकाळी पाऊस अशी शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका वाढतच असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
सततच्या ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगराई वाढू लागली आहे.
१६१२२०२०-बारामती-१६
-------------------------