पुणे - महापालिकेचे या वर्षीचे (सन २०२१-२०२२) अंदाजपत्रक ई स्वरूपात साजरे केले जाणार आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोमवारी मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. याच पार्श्वभुमीवर यंदा हे ई अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे.(Pune Corporation will presented IN Budget due to Corona Pandemic)
pmcbudget2021-2022.com या संकेतस्थळावर हे अंदाजपत्रक पाहाता येणार आहे. महसूल वाढ, आरोग्य सुविधा, गतिमान वाहतूक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, नदी सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, खासगी सहभागातून विकास, शिक्षण, क्रीडा, समाविष्ट गावे, परवडणारी घरे, स्मार्ट सिटी, समाजकल्याणकारी योजना, उद्योग, विद्युत, माहिती तंत्रज्ञान, पथारी व्यावसायिक पुनर्वसन, अतिक्रमण, आपत्ती व्यवस्थापन, कामगार कल्याण या विभागांसाठी अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेल्या विविध योजनांची माहिती या संकेतस्थळावर पाहाता येणार आहेत. या योजनांविषयी नागरिकांना सुचना करता येणार असून, आपली मते व्यक्त करता येणार आहेत. स्थायी समिती अध्यक्षांचे भाषण ही या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. अंदाजपत्रक २०२१-२०२२ सविस्तर माहिती पीडीएफ स्वरुपात उपलब्ध असणार आहे. सोमवारी साडेदहा वाजता सर्वांसाठी संकेतस्थळ सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे