कोरोनाच्या निर्बंधामुळे
शेतीमालाला मागणी घटली : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
बारामती : कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार शासनाने आठवडे बाजार बंद केले आहेत. त्यामुळे बाजारात एकाच दिवशी होणारा भाज्यांचा खप कमालीचा घटला आहे.त्याचा भाजीउत्पादक,फलोत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
आठवडे बाजार हे शेतीमालासाठी सर्वाधिक मोठी बाजारपेठ आहे.एखाद्या मॉलप्रमाणे या ठिकाणी एकाच वेळी सर्व प्रकारचा भाजीपाला, फळभाज्या, फळे,खाद्यपदार्थ योग्य दरात उपलब्ध असतात. यामध्ये शेतकरी स्वत देखील त्यांच्या शेतातील माल विक्रीला आणतात. भाजीविक्रेते ते बाजार समितीच्या लिलावात भाजीपाला मोठ्या प्रमाणावर खरेदी करुन बाजारात त्याची विक्री करतात. या एकाच दिवशी भाजीपाल्याची उलाढाल काही लाखांमध्ये होते. मात्र, कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन ’अंतर्गत च्या निर्बंधामुळे लागू केलेल्या नियमांमध्ये आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत.त्याचा शेतीला मोठा फटका बसला आहे.
याबाबत बारामती येथील श्रीगणेश भाजी मंडई संघटनेचे अध्यक्ष चिऊशेठ जंजिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आठवडे बाजार बंद असल्याने शेतीमालाला उठाव राहिलेला नाही. आठवडे बाजारात शेतीमालाची दुप्पट, तिप्पट विक्री होते.आठवडे बाजारात शेतीमालाला मोठी मागणी असते. मात्र, तो बंद असल्याने या मालाच्या विक्रीवर परीणाम झाले आहे. किरकोळ भाजीविक्रेत्यांची ,फेरी विक्रेत्यांची संंख्या वाढली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना देखील अपेक्षित प्रमाणात उत्पन्न मिळत नाही,असे जंजिरे म्हणाले.
———————————————————
...परवडणारा आंबा बाजारातून गायब
लॉकडाऊनसदृश स्थितीमुळे बदाम,लालबाग,पायरी आदी परवडणाऱ्या आंब्याची खरेदी विक्रेत्यांनी कोरोनाच्या परिस्थितीमुळे केलेली नाही. त्यामुळे बाजारात यंदा हे परवडणारे आंबे अद्याप दिसून येत नाही. ६०० ते ८०० रूपये डझन दराने हे आंबे बाजारात विक्री करण्यात येत आहेत.
—————————————————
फोटोओळी—कोरोनामुळे भाजीविक्रेत्यांकडे ग्राहकांची तुरळक गर्दी होत आहे.
१५०४२०२१बारामती—१८
————————————