पुणे : राज्यात पडलेल्या दुष्काळाचा मोठा फटका यंदा आवळा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पुणे बाजार समितीमध्ये यंदाचा आवळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु दुष्काळामुळे उत्पादन तब्बल ७० टक्क्यांनी घटले असल्याचे आवळ्याचे व्यापाºयांनी स्पष्ट केले.आवळ्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे गेल्या काही वर्षांत आवळ्याच्या मागणी वाढत होत असून, घरगुती वापराबरोबरच प्रक्रिया उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. यामुळे आवळा उत्पादक शेतकºयांना चांगले दर मिळू लागले आहेत. यंदाचा हंगाम सुरु झाला असून, सध्या प्रतिकिलोला २५ ते ३५ रुपये दर मिळत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्पादनामध्ये तब्बल ७० टक्क्यांनी घट झाली असून, गत वर्षीच्या तुलनेत दहामध्ये देखील प्रतिकिलो मागे ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. याबाबत पुणे बाजार समितीमधील आवळ्याचे आडतदार विलास निलंगे यांनी सांगितले की, आवळ्याचा हंगाम साधारण डिसेंबर ते फेबु्रवारी अखेरपर्यंत सुरू होतो. बाजार समितीमध्ये प्रामुख्याने राजस्थानसह करमाळा, मालेगाव आदी भागांतून आवळ्याची आवक होत असते. सध्या हंगाम सुरू झाला असून राजस्थान येथून चकाया जातीच्या आवळ्याची दिवसाआड सुमारे १० टन, तर स्थानिक भागातून एन-७ जातीचा दररोज ४ ते ५ टन आवक होते. यामधील एन ए ७ या वाणाला हिरवा रंग, चमकदार फळ, एकसारखा गोल आकार असल्याने मागणी चांगली आहे. इतर वाणांपेक्षा या वाणाला पाच ते सहा रुपये जास्त दर मिळत आहे. आवळ्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे घरगुती खरीददारासह मोठ्या प्रमामात प्रक्रिया उद्योग, आयुर्वेदिक वैद्य यांच्याकडून आवळ्याची खरेदी केली जाते. कॅन्डी, च्यवनप्राश, ज्युससाठीदेखील आवळ्याची मागणी अधिक असते. पुणे बाजार समितीतून बेळगाव, कोल्हापूर, हुबळी या भागातील बाजारपेठामध्ये आवळा पाठवला जात असल्याचे निलंगे यांनी सांगितले.
दुष्काळामुळे आवळा उत्पादकांना ७० टक्के फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 2:24 AM