दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळ असताना शासनाने जनावरांच्या ना चाऱ्याची व्यवस्था ना छावणी सुरू केली आहे. त्यामुळे येथील पशुधन जगविणे जिकिरीचे झाले असून पशुपालक तालुक्यातील चाकण येथील बाजारात जनावरांची बेभाव विक्री करीत आहेत.खेडच्या पूर्व भागातील कनेरसर मंडळ शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. या परिसरातील कनेसरस येथे पशुधन ५६१६, गाडकवाडी येथे ८७६, चौधरवाडी येथे ३६१७, पुर येथे ३२०६, वरुडे येथे ६२६४, गोसासी येथे ६११६, इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय सुधारित व परप्रांतीय असे २५ हजार ६९५ इतके पशुधन आहे. या साºया नोंदी सरकारी दप्तरी असताना आणि सरकारनेच दुष्काळ जाहीर केलेला असतानाही सरकारकडून या जनवारांच्या चारा-पाण्याच्या व्यवस्थेसाठी काहीच केलेले नाही.
गेल्या काही वषार्पासून खेड तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या छायेखाली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यंदाच्या वर्षातील शेतकºयांच्या हातून रब्बी हंगामाचे पीक गेले आहे. काही शेतकºयांनी ज्वारीची पेरणी केली, परंतु, परतीच्या पावसाने त्याची वाढ खुंटली त्यामुळे जनावरांना काय खायला घालायचा, असा प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे. सद्य स्थितीत डोंगरावरील वाळलेले गवत तसेच शेतकरी चारा आणत आहे.विहिरी आटल्या, ज्वारी होरपळलीऐन हिवाळ्यातच अनेक भागातील विहिरी, नदी, नाले, ओढे, आटले आहेत. त्यामुळे ज्वारीचे पीक होरपळून गेले आहे. गाडकवाडी, वरुडे ,कनेरसर या ठिकाणचे बंधारे कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी तसेच चाºयाअभावी पशुधनाची विक्री करावी तर येणाºया काळात पुन्हा शेती कसण्यासाठी पशुधन आणावे कोठून असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.