शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 2:05 AM

पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

दावडी : पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळात तेरावा महिना उजाडल्याचे त्याला वाटत आहे.पुर्व भागातील गाडकवाडी, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, चौधरवाडी ओळख म्हणजे अवर्षण ग्रस्त गावे. उद्योगधंदा काहीच नाही, त्यामुळे हाताला काम नाही. सगळी मदार शेतीवर. मात्र निसर्गाच्या फेऱ्याने हीच शेती शेतकºयांच्या मुळावर उठली आहे. गतवर्षीचे संकट झटकून नव्या उमेदीने कामाला लागायचे. कर्ज, उसनवारी करून पैसा शेतीत ओतायचा, मात्र लहरी निसर्गाच्या लहरीपणाने मेहनतीवर पाणीच ओतायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील खरीप हंगामातील पिके शेवटची घटका मोजत आहेत. परतीचा पाऊसही न झाल्याने विहिरी, तळी, बंधारे यांनी तळ गाठला आहे.सरकारी आस्थेचाही दुष्काळ नशिबीभयानक परिस्थिती असतानाही खेड तालुका दुष्काळसदृश घोषित केला नाही. जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या निरीक्षणानुसार पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी दहा तालुके दुष्काळसदृश घोषित केले आहे. त्यापैकी खेड तालुका मात्र दुष्काळग्रस्त असल्याचे निरीक्षण नोंदवले नाही. दुष्काळ देखरेख समिती व खेड कृषी विभागातील यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जनतेच्या मनातील उद्विग्नता वाढत आहे.जून महिन्यात जोरदार पावसानंतर खरीप हंगामातील बटाटा व इतर पिकांची पेरणी झाली. ही पिके कशीबशी निघून आली मात्र उत्पन्नात मोठी घट झाली. रब्बी हंगामासाठी पाऊस नसल्यामुळे ज्वारी व इतर पिकांची पेरणी केली नाही. पाऊस नसल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकºयांनी पिकांना पाणी दिले आहे.काही ठिकाणी ठिबक व तुषार सिंचनावर पिके जगवण्याची धावपळ करताना दिसत आहेत. मात्र मुळातच विहिरीतच पाणी नसल्याने ही धावपळ तरी शेवटपर्यंत कामी येईल का अशी परिस्टिती आहे. भारी जमिनीत ओल असल्याने पिके उभी आहेत. हलक्या जमिनीतील पिके जळाली आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे.मोजक्याच गावामध्ये स्थिती समाधानकारक असली लवकरच टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. पाणी आणि चारा दोघांचाही प्रचंड दुष्काळ आहे. जनावरं सांभाळता येत नसल्यानं शेतकरी त्यांना बाजारात विक्रीला आणतोय. मात्र तिथंही भाव मिळत नसल्यानं जनावरं मातीमोल भावात विकावी लागत आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे