लोकमत न्यूज नेटवर्ककाºहाटी : बारामती तालुक्यातील दुष्काळ हटेना. महत्त्वाचा खरीप हंगाम पाण्यावाचून शेवटची घटका मोजत आहे. सलग चार वर्षांचा दुष्काळ, पाण्याची कमतरता व जनावरांसाठी चाºयाची कमतरता व शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच याही वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने या भागावर सलग पाचव्या वर्षीही दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत.या वर्षी काही ठिकाणीच तुरळक पाऊस झाला. मात्र बहुतांश भागात पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरीसुद्धा पाऊस नाही. ओढे, नाले कोरडे ठणठणीत पडले आहेत. विहिरींचे तळ उघडेच आहेत. ऐन पावसाळ्यात पाण्याच्या कमतरतेने शेतकºयांच्या अपेक्षांचा चुराडा झाला आहे. शेतात केलेला खर्च, बियाणे, मशागतीचा खर्च करूनच शेतकरी मेटाकुटीस आला आहे.बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जानाई शिरसाई व पुरदंर उपसा योजना केली. या भागातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाण्याच्या दुर्भिक्षाविषयी माहीती देऊनही पाणी सोडले नाही. या भागात पावसाळ्यात देखील पाणी पाणी करावे लागत आहे.>सर्व तलाव कोरडे पडल्याने टंचाईत वाढपाण्याची टंचाई लक्षात घेऊनच या योजना राबवल्या. मात्र या भागातील पिके जळून चालली आहेत. पिण्याचे पाणी नाही. सर्व तलाव कोरडे पडले आहेत, तर मग योजनाच कशासाठी केली, असा सवाल शेतकरी पोटतिडकीने करीत आहेत.>ंदुष्काळ जाहीर करण्याची मागणी; जनावरांचा चारा महागलालोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : इंदापूर तालुक्यात आॅगस्ट महिना अर्धा संपत आला तरीही पाऊस नसल्याने चार महिन्यांत निघणारी नगदी पिके गायब होणार असल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे. जनावरांचा चारा महागला असून कडब्याच्या एका पेंडीला ३० रुपये दर देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. अद्याप पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.खरिपाची पेरणीच झालेली नसल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग तालुक्यातून गायब झाल्याचे चित्र यावर्षी दिसत आहे. जर आॅगस्टअखेरपर्यंत पाऊस न झाल्यास कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. खरिपाच्या पेरण्या जवळजवळ तीन महिन्यांनी लांबल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनात कमालीचा फरक पडलेला आहे. कडब्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने एका कडब्याच्या पेंडीला ३० रुपये मोजावे लागत आहेत. जिरायती भागातील काही मोजक्या शेतकºयाने मकापिकाची पेरणी केलेली आहे. परंतु मका उन्हाने जळल्यासारखे दिसत आहे.सोयाबीन, उडीद, मूग या खरिपाच्या पेरणीतील नगदी समजले जाणारी कडधान्य पिके तालुक्यात पेरणी न झाल्याने यावर्षी हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. त्वरित या शेतकºयांना जळालेल्या पिकांची व पेरणी न झालेल्या शेतकºयांच्या जमिनीची पाहणी करण्यात यावी व दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना मदत करण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.>जिरायती भागातील जनता आंदोलनाच्या पवित्र्यातमोरगाव : बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोरगावसह परिसरातील आठ, दहा गावांत टँकरद्वारे एक बॅरल पाणी मिळत आहे. पावसाळ्यातच पाणी पाणी करावे लागत असल्याने आता ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.तालुक्यातील मोरगाव, आंबी बु., आंबी खुर्द, जोगवडी, तरडोली, लोणी भापकर, लोणी माळवाडी, काºहाटी, बाबुर्डी, जळगाव क. प. आदी गावे जेजुरी येथील नाझरे जलाशयावर अवलंबून आहेत. तरडोली येथे तब्बल दहा दिवसांतून गावठाणात टँकरचे पाणी आज आले. मात्र तेही केवळ एक बॅरल मिळाले. काहींनी पाणी न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त केला.एक बॅरल पाणी आंघोळ, जनावरांना पाणी, कपडे धुणे, प्रातर्विधी व पिण्यासाठी कसे वापरायचे? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जुलै महिन्यात केवळ १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा नाझरे धरणात असल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, तरीही प्रशासनामार्फत कुठलीही ठोस उपाययोजन सुरू न केल्याने गावागावांतील ग्रामस्थ संतप्त आहेत.
जिरायती भागावर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:55 PM