शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

बागायती भागातही दुष्काळाची दाहकता

By admin | Published: March 13, 2016 1:31 AM

आता जिरायत भागाबरोबरच बागायती भागातही दुष्काळाची दाहकता स्पष्ट दिसू लागली आहे. नीरा खोऱ्यातील विहिरी, बोरवेलसारखे जलस्रोत आटले असून, बागायती भागही पाण्याअभावी होरपळून निघत आहे

सोमेश्वरनगर : आता जिरायत भागाबरोबरच बागायती भागातही दुष्काळाची दाहकता स्पष्ट दिसू लागली आहे. नीरा खोऱ्यातील विहिरी, बोरवेलसारखे जलस्रोत आटले असून, बागायती भागही पाण्याअभावी होरपळून निघत आहे. यामुळे शेकडो एकर ऊस जळाला आहे. महिन्यापूर्वी नीरा डावा कालवा बंद झाल्यापासून वीर धरण ते इंदापूरपर्यंतच्या बागायती पट्ट्यातही पाण्याची कमतरता भासू लागली. हळूहळू ही कमतरता तीव्र होऊ लागली. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पिके सोडून दिली आहेत. बोरवेल पूर्ण बंद झाली असून, २४ तास मोटारी चलणाऱ्या विहिरी अर्धा ते एक तासावर आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे ऊस कारखान्यांना तुटून जाणे बाकी आहे. तुटून जाणाऱ्या उसाला पाणी द्यावे की लहान ऊस जगवावा, हे समजत नाही. अनेक शेतकऱ्यांकडे तर पाणीच नसल्याने त्यांची पिके पूर्णत: जळाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यापूर्वी उसाची पिके भिजवली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या उसाला पाणी मिळालेले नाही. तुटून जाणाऱ्या उसाला पाणीच नसल्याने खोडवा उसाचे एकरी टनेज ३० वर आले आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याकडे दीड लाख टन, माळेगाव कारखान्याकडे एक लाख टन तर छत्रपती कारखान्याकडे अजून ७० हजार टनांच्या आसपास ऊस शिल्लक आहे. हा ऊस लवकरात लवकर गाळप करण्यासाठी शेतकी विभाग डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. सोमेश्वर कारखान्याने नुकताच दौंड शुगर कारखान्याशी ५० हजार टनांचा करार केला आहे. महसूलमंत्र्यांबरोबर बैठक होणे अपेक्षित होते; त्यांच्या अपुऱ्या वेळेमुळे बैठक होऊ शकली नाही. आता पुण्याचे पालकमंत्री बापट यांच्या निर्देशनानुसार नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन प्रस्तावित आहे. - विजय नलवडे,उपअभियंता, नीरा डावा कालवा