मोखाडा : गेल्या वीस पंचवीस दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने पाऊसा अभावी भात पीक संकटात आले असून जव्हार व मोखडा तालुक्यावर दुष्काळाचं सावट पसरले आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने हळव्या भातासह गरव्या भात पिकाला दिलासा मिळाल परंतु असे असले तरी करपा, खोडकीडा, बगळया या रोगाचा फटका पिकांना बसला आहे.पावसाची हुलकावणी, वाढते उन्ह आणि रोगांचा प्रादुर्भावामुळे शेतीवर दोन्ही तालुक्यात संकट आहे. ऐन भात पीक तयार होण्यासाची प्रक्रि या सुरू असताना आवश्यक पाऊस शेतीला मिळाला नसल्याने भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर करपलेले भात, जमिनीला पडलेल्या भेगा जणूकाही दुष्काळच चित्र दर्शवित आहे.मोखाड्यात २५९ गावपाडे असून नागली, भात, वरई, खुरासनी, कुळीद, उडीद, तूर आदी पिके घेतली जातात परंतु यामधील भात हे पीक प्रामुख्याने घेतले जात असून २ हजार ३७ हेक्ट्रर जमिनीवर भाताची लागवड होते. सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ९५ टक्के भाताची लागवड करण्यात आली परंतु येथील वरच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती सध्या धोक्यात आले आहे. या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.निसर्गापुढे शेतकरी मेटाकुटीलादरवर्षीच शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक संकटात सापडतो. त्यामुळे बँकांकडून घेतलेले पीक कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्याच्यापुढे आहे. अनेक विघ्नांवर मात करीत केली जाणारी पारंपरिक शेती पुढे करायची की नाही असा प्रश्न पुढे येऊन ठाकला आहे..!
पावसाची हुलकावणी : जव्हार, मोखाडा तालुक्यांवर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 2:28 AM