लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुण्यातील उड्डाणपुलांचे डिझाईन करणाऱ्यांना ‘नोबेल’ पारितोषिकच द्यावे, अशी संतप्त मागणी सध्या वाहनचालक करीत आहेत. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुण्यात अनेक उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी एकमेव पर्याय म्हणून उड्डाणपुलांकडे पाहण्यात येते. परंतु, बांधकामामध्ये काही ना काही त्रुटी राहील्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. काही उड्डाण पुलांचे डिझाईनच चुकले आहे, तर काहींचा फारसा उपयोगच झालेला नाही.‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत काही पुलांवरही वाहतूक कोंडी होत असल्याचे पहायला मिळते आहे, तर दुसरीकडे उड्डाणपुल रिकामे आणि त्याला जोडून असलेल्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याची स्थिती आहे. स्मार्ट सिटीच्या नियोजनामध्ये स्मार्ट वाहतूक करायची असल्यास ‘स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर’ची आवश्यकता आहे. शहराचा विस्तार आता ४० किलोमीटरच्या परिघाबाहेर गेला आहे. आता मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. परंतु, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सुयोग्य नियोजनाची आवश्यकता आहे तेच नियोजन उड्डाणपुल उभे करताना झाल्याचे दिसून येत नाही.
उड्डाणपुलांमुळे खोळंबाच
By admin | Published: May 11, 2017 4:41 AM