लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या सुरु असलेल्या पितृ पंधरवड्यामुळे मार्केट यार्डात गवार, कारली, डांगर भोपळा यांना जास्त मागणी असते. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. रविवारीच जवळ-जवळ सर्वच भाजीपाल्याला मागणी वाढल्यामुळे बऱ्याच फळभाज्यांचे बाजारभाव २० ते ४० टक्के वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
पितृ पंधरवड्यात विशेषतः गवार, कारली, वांगी, डांगर भोपळा, वाटाणा, बीन्स घेवडा, टोमॅटो, फ्लाॅवर, वाल, सिमला इत्यादींचे बाजार वाढल्याचे दिसून आले. भाज्या खरेदी करण्यासाठी मार्केट यार्डात ग्राहकांनी रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
------
चौकट
पितृ पंधरवड्यात लागणाऱ्या प्रमुख भाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे...
वाण प्रतिकिलोचे भाव
* गवार गावरान ७०-८०
* कारली ३०-३२
* वांगी ३०-३५
* डांगर भोपळा १०-१२
* वाटाणा १००-१२०
* बिन्स ४५-५०
* टोमॅटो १०-१२
* फ्लाॅवर २२-३०
* वाल ३५-४०
* सिमला इंडस ३५-३८