पुणे : विसगाव खोर्यात नेरे, वरवडी, खानापूर, बाजारवाडी (ता. भोर) परिसरात शुक्रवारी (दि. ६) संध्याकाळी सहाच्या दरम्यान पावसाने दोन तास विजांच्या कडकडाट तसेच जोराच्या वादळी वार्यासह जोरदार हजेरी लावली. मात्र यामुळे भात, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून या पावसाचा परिणाम हळव्या भात पिकांवर तसेच शेतात काढणी करून ठेवलेल्या सोयाबीन, भुईमूग पिकावर झाला आहे. अचानक झालेल्या या पावसाने शेतकर्यांची, जनावरांची मोठी धांदल उडाली असून ओढ्या-नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन दिवसाच्या पाठीमागील काळात परिसरात धुके पडल्याने भात पिकावर रोग पडला आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. प्रवासात असणार्या नागरिकांची ही धावपळ उडाली. यावेळी प्रवाशांनी रस्त्याकडेच्या झाडाझुडपांचा बचावासाठी आधार घेतला असल्याचे चित्र होते.
मुसळधार पावसामुळे भात, सोयाबीन, भुईमूगाचे नुकसान; रब्बीच्या पेरण्या लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:31 PM
पावसाने दोन तास विजांच्या कडकडाट तसेच जोराच्या वादळी वार्यासह जोरदार हजेरी लावली. मात्र यामुळे भात, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
ठळक मुद्देअचानक झालेल्या या पावसाने शेतकर्यांची, जनावरांची धांदल उडाली.रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडणार आहेत.परिसरात धुके पडल्याने भात पिकावर रोग पडला आहे.