पुणे: कोल्हापूर व सांगलीसह राज्यातील २१ जिल्ह्यांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला असून त्यात पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ७१ शाळांना अतिवृष्टीमुळे बाधित झाल्या आहेत.पावसाच्या पाण्यामुळे काही शाळांच्या सर्व वर्ग खोल्यांची पडझड झाली आहे.तर काही वर्ग खोल्यांची दुरूस्ती करावी लागणार आहे.त्यासाठी सुमारे २ कोटी ६३ लाख एवढा खर्च येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिका-यांकडून सांगितले जात आहे.राज्यातील २१ जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठे नुकसान झाले.विद्यार्थ्यांना शाळेत बसून शिक्षण घेण्यासाठी वर्ग खोल्याच उपलब्ध राहिल्या नाहीत.शिक्षण अधिका-यांनी याबाबतचे सर्वेक्षण केले असून राज्यातील सुमारे २ हजार १७७ शाळा बाधित झाल्या आल्याची माहिती शिक्षण विभागाला दिली आहे. त्याच आधारे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदे घेवून सर्व शाळांच्या उभारणीसाठी ५७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल,अशी घोषणा केली.परतु,शिक्षण विभागाने दिलेल्या शाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शाळांच्या वर्ग खोल्यांच्या पुनर्बांधणीसाठी लागणा-या निधीत वाढ करावी लागेल,असे बोलले जात आहे.शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यातील ३ तालुक्यांमधील ११ शाळांची दुरूस्ती करावी लागणार आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार भोर, वेल्हा, मुळशी,मावळ, खेड,पुरंदर, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या आठ तालुक्यांमधील ७१ शाळांंना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे या ७१ शाळांमधील २११ वर्ग खोल्या दुरूस्त कराव्या लागतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. शाळा नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग जवळच्या शाळेत स्थलांतरित केले आहेत.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७१ शाळांची पडझड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 8:42 PM
राज्यातील २१ जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठे नुकसान झाले.
ठळक मुद्देआठ तालुक्यातील शाळांच्या दुरूस्तीसाठी 2 कोटी 63 लाखांची गरजपुणे जिल्ह्यातील ३ तालुक्यांमधील ११ शाळांची दुरूस्ती करावी लागणार