मुळशी तालुक्यामध्ये भात हे शेतीचे मुख्य पीक आहे, तर यामध्ये इंद्रायणी वाणाचे पीक हे जास्त घेतले जाते. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यामध्ये चारसूत्री पध्दतीने भात लागवड केली जाते. यावर्षी पावसाने जून महिन्यामध्येच दमदार हजेरी लावली असताना सर्वत्र समाधानाचे व आनंदाचे वातावरण होते. परंतु सद्य:परिस्थितीमध्ये याच पावसाने ओढ दिल्याने मुळशीकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा यावर पर्याय म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी, तलाव व नदीच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे मुळशी तालुक्यांमध्ये भात लागवड तुरळक सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
--
०७ फोटो क्रमांक : ०७ मुळशी भात लागवड
फोटो ओळ : पद्मावती विकास सोसायटीचे संस्थापक लहू सुतार यांच्या शेतात सुरू असलेली भात लावणी.