शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अपक्षांच्या आशा संपुष्टात

By admin | Published: January 11, 2017 3:49 AM

सदस्यीय प्रभाग पद्धतीचा सर्वाधिक फटका अपक्षांना बसला आहे, एकट्याच्या बळावर चारच्या प्रभागातून निवडून येणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे

पुणे : चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा सर्वाधिक फटका अपक्षांना बसला आहे, एकट्याच्या बळावर चारच्या प्रभागातून निवडून येणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याऐवजी कोणत्या तरी पक्षाचा आधार घेऊन निवडणुका लढविण्यावर भर दिला जात आहे.महापालिकेची निवडणूक वॉर्डपद्धतीने पार पडत होती, त्या वेळी संबंधित भागामध्ये चांगली छाप असलेल्या तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली जात होती. स्वत:ची स्वतंत्र सुभेदारी निर्माण करण्यावर त्यांच्याकडून भर दिला जायचा. पालिकेमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळता त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास अपक्षांचा भाव भलताच वधारत असे. त्या जोरावर ती पालिकेतील महत्त्वाची पदे मिळविण्याचा प्रयत्न करीत.मागील वेळेस २ सदस्यीय प्रभाग पद्धतीने पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्या वेळी अश्विनी कदम या एकमेव नगरसेविका अपक्ष म्हणून निवडून येऊ शकल्या. यंदाचा दोनचा प्रभाग दुप्पट करून चार सदस्यीय बनविण्यात आला आहे. त्यामुळे मिनी विधानसभेचे मतदारसंघ तयार झाले आहेत. त्यामुळे ज्याची आमदार बनण्याची क्षमता आहे, तोच अपक्ष म्हणून नगरसेवक बनू शकणार आहे. (प्रतिनिधी)पैसे लाटण्यासाठीही काही जण राहतात उभेअपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरायचा. त्यानंतर संबंधिताने अर्ज मागे घ्यावा यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून गळ घातली जाते. तेव्हा त्या उमेदवारांकडून थोडेफार पैसे घेऊन माघार घ्यायची असे प्रकारही काही अपक्ष उमेदवारांकडून केले जात असल्याचे दिसून आले आहे. निवडून येण्याऐवजी  पाडण्यासाठी उभे राहतात अपक्षअनेकदा प्रतिस्पर्धी उमेदवाराची मते खाण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे केले जातात. एखाद्या परिसरातील एकगठ्ठा मते आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळू शकतील असे वाटल्यास त्या भागातील गणेश मंडळाचा अध्यक्ष किंवा एखाद्या कार्यकर्त्याला मुद्दामहून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास सांगितले जाते. त्यातून प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते खाण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या भागातील मते आपल्याला मिळणारच नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर अशा प्रकारचे डावपेच लढविले जातात. त्यामुळे अपक्ष उमेदवार हे बऱ्याचदा निवडून येण्याऐवजी प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडण्यासाठी उभे केले जातात.अपक्ष म्हणून निवडून येऊ असा विश्वासराजकीय पक्षांचे उमेदवार निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये व्यवस्थित लक्ष देत नाहीत. नगरसेवकांकडे प्रश्न घेऊन गेल्यावर ते सांगतात, ‘‘आम्ही पैसे देऊन निवडून आलो आहोत, आता आम्ही तुमची कामे करणार नाही.’’ त्यामुळे नागरिकांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. मी गेल्या ५ वर्षांत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. - भरत सुराणा, अपक्ष उमेदवार, महर्षीनगर