शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
5
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
6
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातच सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’,  भाजपा खासदार अनिल बोंडे यांचा टोला
7
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
8
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
9
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
10
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
11
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
12
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
13
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
14
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
15
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
16
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
17
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
18
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
19
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
20
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."

नादुरुस्त रोहित्रांमुळे विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 2:19 AM

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कोयाळी भानोबाची परिसरात वारंवार विद्युत रोहित्र नादुरुस्त होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कोयाळी भानोबाची परिसरात वारंवार विद्युत रोहित्र नादुरुस्त होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीकडून बदलून दिलेली विद्युत रोहित्रे सुरू होण्यापूर्वीच बंद पडत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, शेतसिंचनाचा गहन प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.वाकलेले खांब, कुजलेल्या फ्यूजपेट्या आणि हाताच्या अंतरावर लोंबकळणाºया वीजवाहक तारा अशी विदारक परिस्थिती कोयाळीत पाहायला मिळत आहे. त्यातच विद्युत रोहित्रांमध्ये वारंवार बिघाड घडून येत असल्याने शेतकºयांच्या समस्या अधिक वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत तर जणू काही रोहित्र नादुरुस्त होण्याची स्पर्धाच सुरू असल्याचा अनुभव स्थानिक शेतकºयांना येत आहे. कारण यापूर्वी कोयाळी हद्दीतील काचबंगला येथील चार, बिरोबावस्तीच्या दोन, राणूबाईमळा येथील दोन व पोकळेदरा येथील एक अशी एकूण नऊ रोहित्रे नादुरुस्त झाली आहेत. विशेष म्हणजे रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर स्थानिक शेतकरी स्वत: पदरखर्चाने ते बदलून आणत आहेत. मात्र रोहित्र जोडणीनंतर वीजपुरवठा सुरू करण्यापूर्वीच पुन्हा नादुरुस्त होत आहे. परिणामी नवीन रोहित्र जळते कसे? असा संतापजनक सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीची कामे अंतिम टप्प्यात सुरु आहेत. त्यामुळे शेतसिंचनासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असतानाही रोहित्राअभावी लागवडीच्या कामांना दिरंगाई होत आहे. तसेच खेडचा पूर्व भाग हा ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातच आॅक्टोबर हिटच्या कडक उन्हामुळे उसाला अधिक पाणी देण्यातही शेतकºयांची अडचण निर्माण होत आहे. वीज महावितरण कंपनीने शेतकºयांची समस्या लक्षात घेऊन हाताच्या अंतरावर लोंबकळणाºया वीजवाहक तारा, वाकलेले खांब व नादुरुस्त फ्यूजपेट्यांची दुरुस्ती करून देण्याची मागणी सरपंच रेश्मा बनसोडे, उपसरपंच संजय दिघे, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब सरोदे, विकास भिवरे, विठ्ठल कोळेकर, सुभाष बनसोडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कोळेकर आदींनी केली आहे.फ्यूजपेट्यांची दुरवस्थाकोयाळी-भानोबाची हद्दीतील शिंदेवस्ती, रानमळा, गावठाण, पोकळेदरा, काचबंगला, दिघेवस्ती, बिरोबावस्ती येथे असलेल्या विद्युत रोहित्रांच्या फ्यूजपेट्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे फ्यूज उडाल्यानंतर पुन्हा तो कार्यान्वित करण्यासाठी शेतकºयांना जीव धोक्यात घालून जोडणी करावी लागत आहे.तसेच हाताच्या अंतरावर लोंबकळणाºया वीजवाहक तारांमुळे काही दिवसांपूर्वी शॉर्टसर्किट होऊन टेंगले वस्तीवर उसाला आग लागली होती.

टॅग्स :electricityवीजKhedखेड