शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

अवैध धंद्यामुळे प्रवासी झाले हैराण

By admin | Published: January 13, 2017 3:01 AM

खडकी रेल्वे स्थानक परिसरात आवाराच्या मध्येच सिमेंट गोडाऊनच्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मटका धंदा

खडकी : खडकी रेल्वे स्थानक परिसरात आवाराच्या मध्येच सिमेंट गोडाऊनच्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मटका धंदा दिवसाढवळ्या सुरु असून, हाकेच्या अंतरावरच रेल्वे पोलीस चौकी रेल्वे पोलीस कक्ष आहेत व जवळच खडकी पोलीस स्थानक आहेत. या धंद्याची पोलिसांकडे ना दाद , ना फिर्याद आहे.मुंबई-पुणे महामार्गावर शिवाजीनगरपासून पाच किलोमीटर अंतरावर खडकी रेल्वे स्थानक आहे. स्थानकमध्ये २ प्लॅटफॉर्म असून या स्थानकात रोज लोकलच्या १२ फेऱ्या व लांब पल्ल्याच्या ८ ते १० गाड्या थांबतात. औंधरोडपासून नुकताच नवीन पादचारी पूल तयार करण्यात आला आहे. मात्र त्याचा फारसा उपयोग पादचाऱ्यांना होत नाही कारण पूल महामार्गाच्या एका बाजूलाच उतरवण्यात आला आहे. खडकी बाजार कडे जाण्यासाठी प्रवाशांना जीव धोक्यात घालून रास्ता ओलांडावा लागतो ,खडकी बाजार कडून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी कोणताही पूल नाही, स्थानकाच्या दोन्हीही प्लॅटफार्मवर एकही उपाहारगृह अथवा कॅन्टीन नाही. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजास्तव बाहेर महामार्ग ओलांडून जावे लागते, पोलीस सुरक्षा कक्षात अनेक वेळा पोलीस उपस्थित नसतात. लोकलमध्ये पाकीटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्याबाबत तक्रार करायला गेल्यावर पोलीस कक्षात पोलीस नसतात. तोपर्यंत चोरटे पसार झालेले असतात. या प्लॅटफॉर्मवर तपासणी होत नसल्याने अनेक जण विना तिकीट प्लॅटफॉर्मवर जातात. त्यानंतरच पाकीटमारीच्या घटना घडतात, असे काही प्रवाशांनी सांगितले.रेल्वेतून पडून अनेक जणांचा मृत्यू होतो. त्यांना तत्काळ उपचार मिळण्याकरिता कोणत्याही सुविधा स्थानकात नाहीत. वेळेत उपचार मिळाल्यास अनेक जणांचे प्राण वाचतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.