आंबेठाण : सध्या बाजारात जुना आणि नवीन कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यात कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. चाळीत साठवलेला कांदा आता कोंब येत असल्याने चाळीत गुदमरून सडू लागला आहे. साठवणुकीतील हा कांदा अवघ्या १ ते २ रुपये किलो दराने बाजारात आणून विक्री करावा लागत आहे. तसेच नवीन चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या कमाल भावात ८ ते ९ किलो रुपयांच्या पुढे जात नाहीत. कांद्याला मिळणारा हा भाव परवडणारा नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. तसेच सरकारकडून देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या अनुदानावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत.सध्या बाजारात हजारो क्विंटल कांद्याची आवक सुरू झाली आहे. रोजच कांद्याच्या आवकेत वाढच होत चालली आहे. मात्र कांद्याचे भाव ४ ते ९ किलो रुपये यापुढे जात नाही. जुन्यापाठोपाठ नव्या कांद्यानेही शेतकºयांचे गणित बिघडवले आहे. उन्हाळी कांद्याची आवक अजूनटिकून आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत स्थानिक कांदा दाखल झाल्याने बाजारभावात घसरणसुरूच आहे. यंदा चाकणच्या मार्केटमधील कांद्याला देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल राज्यात व दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश व सिंगापूर या परदेशात मागणी सर्वसाधारण असून बाजारभाव४०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावले आहेत.>तहान लागली; खोदा विहीरकांदापिकाबाबतचे धरसोडीच्या धोरणामुळे कांद्याच्या एकूण निर्यातीवर परिणाम झाला आहे. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय येथील शेतकºयांच्या फारशा फायद्याचा ठरणार नसल्याने स्पष्ट आहे. कारण हे अनुदान केवळ १५ डिसेंबरपर्यंत बाजार समितीत कांदा घेऊन येणाºया शेतकºयांना दिले जाणार आहे.उन्हाळी आणि नवीन कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे केंद्राने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. त्यामुळे बाजारात येणाºया उच्च प्रतीच्या नवीन कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे होत नाही.>दरवर्षी तोच अनुभवप्रत्येक वर्षी या हंगामात कांद्याच्या झुलत्या बाजारभावाने उत्पादक शेतकºयांच्या उरात धडकी भरत आहे. यंदा पावसाच्या लहरीपणाने कसेबसे कांद्याचे पीक जगवले व आता कांदा बाजारात विक्रीसाठी आणला असता भावाने दगा दिल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कांद्याचे बी-बियाणे, खते, औषधे व वाहतूक खर्चात वाढ झालेली असल्याने कांद्याच्या उत्पादनाचे गणित कोलमडले आहे.
कांद्याच्या भावात सुधारणा होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 1:56 AM