शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

'स्वायत्त संस्थांमधील हस्तक्षेपामुळे देश अधोगतीकडे'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 12:38 AM

माजी कृषिमंत्री शरद पवार यांची सरकारवर टीका : डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता

उरुळी कांचन : ‘‘सत्ताधारी राजकारणी ज्या वेळी आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्था यासारख्या स्वायत्त संस्थांत हस्तक्षेप करतात, तेव्हा त्या संस्थांची स्वायत्तता धोक्यात येते. यामुळे देश अधोगतीकडे जातो, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेच्या रौप्य्महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मुख्य अतिथी म्हणून माजी कृषिमंत्री शरद पवार उपस्थित होते, त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.

याप्रसंगी आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, चंद्रराव तावरे, एन. जी. हेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, विजय कोलते, देविदास भन्साळी, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड, संस्थेचे माजी मानद सचिव अनिलकुमार शितोळे, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, कांतिलाल चौधरी, भाऊसाहेब कांचन, संजय कांचन, खेमचंद पुरुषवाणी, बाळासाहेब कांचन, सुभाष धुकटे, प्रकाश जगताप, जनार्दन गोते, चंद्रकांत लोणारी, माया शितोळे, सारिका काळभोर व संस्थेचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, अजय पवार, ऋषिकेश भोसले आदींसह अनेक मान्यवर, सभासद उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘सहकारी संस्थांकडे बघण्याचा सरकारचा व त्यांच्या अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन बदलल्याने आज सहकारातील सर्वसामान्य सभासदाला त्रास होतोय. हा त्रास थांबणे गरजेचे आहे. लोकशाहीमध्ये स्वायत्त संस्थांची जपणूक करणे आणि त्यांना महत्त्व देणे हे अत्यंत महत्त्वाचे काम सरकारचे आहे. परंतु, आज सरकार या संस्थांचे अस्तित्व संपविण्याच्या मागे लागले आहे. नोटाबंदी हा निर्णय जनतेने काळा पैसा नष्ट होईल किंवा बाहेर येईल म्हणून स्वीकारला; पण आरबीआयच्या अहवालावरून दिसते, की जेवढ्या नोटा सरकारने जाहीर केल्या तेवढ्याच परत आल्या. यावरून काळा पैसा सापडला नाही, हे सिद्ध झाले. काळा पैसा नेमका कोणाकडे आहे, हेच सरकारला कळाले नाही. धनदांडग्यांचा काळा पैसा वाढविण्यासाठी सरकार काम करतेय का, अशी शंका येते.’’राष्ट्रीयीकृत बँकांत टायवाल्याला सन्मान, तर आदिवासीला अपमान अशा प्रकारची वागणूक दिली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे. सहकार चळवळीत नेतृत्व चांगले आणि पारदर्शी असेल, तर संस्थेची प्रगती होते; पण चमत्कारिक नेतृत्व आले तर सोन्यासारखी संस्था बरबाद होते, असे घणाघाती प्रतिपादन पवार यांनी केले.भारत सरकारच्या अखत्यारीतील आयकर विभाग देशभरात सर्वांना समान न्याय द्यायचे काम करीत नाही, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांना आयकर खात्याने कलम ८० पी व २६९ एसएसच्या अन्वये नोटिसा पाठवून आयकर भरण्यासाठी आणलेले दडपण व केलेली सक्ती अन्यायकारक असून त्याविरुद्ध लोकसभेतच आवाज उठविणार आहे. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांमध्ये देशातील ५० टक्के सहकारी संस्थांचे जाळे पसरलेले असून, त्या माध्यमातून या दोन्ही राज्यांनी चांगली प्रगती केलेली आहे; पण हे सरकार सहकार मोडीत काढण्याचे काम करतेय. जनतेने वेळीच सावध होऊन याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीPuneपुणे