पुणे : महामेट्रोच्या भोंगळ कारभरामुळे कर्वे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महापालिका आणि महामेट्रो यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे कर्वे रस्ता आणि कोथरूड परिसरामधील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रोज मलवाहिन्या आणि पाण्याच्या मुख्य वाहिनी फुटत असल्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहे. त्यामुळे मेट्रोने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच काम करावे. नागरिकांना यापुढे त्रास झाल्यास मेट्रोचे काम करू देणार नसल्याचे शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.
याविषयी मेट्रोचे अधिकारी गाडगीळ म्हणाले, ‘‘महामेट्रोकडून ज्या रस्त्यांवर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे, अशा रस्त्यांवर बॅरिकेड लावले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येते. जमिनीखालील सेवा वाहिन्यांची माहिती महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. काही वेळा प्रत्यक्ष जमिनीखालची परिस्थिती वेगळी असते. नागरिकांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येते. लवकर लोकप्रतिनिधी, वाहतूक विभाग यांची एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन गाडगीळ यांनी दिले.ज्या भागात काम करण्यात येत आहे, अशा ठिकाणी कामाचे फलक लावावेत, स्थानिक लोकप्रतिनिधींना कामाची माहिती देण्यात यावी, संबंधित अधिकारी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.नागरिकांना त्रास, अधिकाऱ्यांची दिरंगाईकर्वे रस्त्यावर सध्या वनाझ ते रामवाडी मेट्रोमार्गाचे काम सुरु आहे. मेट्रोच्या कामामुळे वारंवार जलवाहिन्या आणि मलवाहिन्या फुटत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रोच्या अधिकाºयांकडून काम करण्यास दिरंगाई करण्यात येते. आम्ही कोणाकडे तक्रार करायची, हा प्रश्न आहे. महापालिका प्रशासनाला याबाबत कळवल्यास महामेट्रोकडून काम करण्यात येईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे कोण कोणते काम करणार आहे, याची माहिती नगरसेवकांना मिळत नाही, असे सुतार म्हणाले. नगरसेवक दिलीप बराटे, माधुरी सहस्रबुद्धे यांनी मेट्रोच्या कामासंदर्भात आक्षेप घेतले.