बेल्हा : बेल्हा (ता. जुन्नर) येथील ब्रिटिशकालीन गोदामांची दुरवस्था झाली आहे. ही गोदामे आज कचराकुंडी तसेच मोकाट जनावरांचे स्वच्छंद ठिकाणे बनली आहेत. परिसरातील दुकानदारांना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.बेल्हा येथे ब्रिटिशकालीन दोन गोडावून आहेत. ही गोदामे ना ग्रामपंचायतीच्या ताब्यात ना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात अशी परिस्थिती आहे. परिणामी गोदामांकडे कोणी लक्ष द्यायचे व त्याची तक्रार कोणाकडे करायची, अशी बाब आहे. गोदामांचे लोखंडी पत्रे गंजले आहेत. गोदामाचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जात आहे. परिणामी डुकरांचा तसेच मोकाट जनावरांचा वावर कायमच असतो. ही गोदामे ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.
बेल्ह्यातील गोदामांची योग्य नियोजनाअभावी दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:16 AM