पुणे : परिवहन संवर्गातील प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या पाठीमागे रिफ्लेक्टर, रिफ्लेक्टिव टेप, रियर मार्किंग टेप बसवणे बंधनकारक आहे. मात्र ते बसविले नसल्याने पुण्यासह राज्यातील सर्वच परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) वाहनांचे पासिंग रोखले आहे.
राज्यात रिफ्लेक्टरचा पुरवठा करणाऱ्या तीन पैकी एका कंपनीने प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याला उत्पादनास मनाई करण्यात आली आहे. उर्वरित दोन कंपन्यांनी रिफ्लेक्टरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचे सांगितले जाते. शिवाय ‘रिफ्लेकटर’च्या किमतीतही मोठी वाढ करण्यात झाली आहे. लॉकडाऊननंतर आयुष्य कसेबसे सुरू होत असताना आता पुन्हा अशा बाबींचा फटका वाहनचालकांना बसत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहे.
चौकट
“गेल्या तीन दिवसांपासून राज्यात रिफ्लेक्टरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याचे भाव वाढविण्यात आहे. रिफ्लेक्टर नाही म्हणून पुण्यासह राज्यात प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनाचे पासिंग झालेले नाही. परिवहन आयुक्तांनी याची तत्काळ दखल घ्यावी.”
-बापू भावे, खजिनदार, पुणे शहर रिक्षा फेडरेशन
चौकट
“रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांना आळा बसावा म्हणून वाहनाच्या पाठीमागे ‘रिफ्लेक्टर’ बसविणे अनिवार्य केले. मात्र याचा तुटवडा निर्माण झाला आहे का, याची माहिती नाही. तुटवडा दूर करण्यासाठी अन्य काही कंपन्यांनी परवानगी मागितली तर त्यांना देखील परवानगी देऊ.”
-डॉ. अविनाश ढाकणे, राज्य परिवहन आयुक्त, मुंबई