शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नवरात्रीमुळे आॅटोमोबाईल क्षेत्रात तेजी, बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, मुहूर्त साधण्यासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 5:17 AM

एकीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये रेलचेल सुरू झाली आहे. दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी ग्राहकांनी महिन्याभरापूर्वीपासून गाड्यांच्या दुकानांमध्ये नोंदणी केली आहे.

पुणे : एकीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये रेलचेल सुरू झाली आहे. दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी ग्राहकांनी महिन्याभरापूर्वीपासून गाड्यांच्या दुकानांमध्ये नोंदणी केली आहे. साडेतीन मुहूर्तांपैैकी एक असणाºया दसºयाच्या मुहूर्तावर गाडी घरी आणण्याकडे कल असतो. त्यामुळे आॅटोमोबाईल क्षेत्रातील उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सेकंड हँड गाड्या घेण्याकडील कलही वाढला आहे.सणासुदीच्या काळात दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात झुंबड उडालेली दिसते. पसंतीचे वाहन मिळावे, यासाठी नवरात्रीच्या आधीपासूनच तयारी केलेली असते. ग्राहकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे शोरूम मालकही सज्ज झाले आहेत. इतर वेळच्या तुलनेत नवरात्रीमध्ये गाड्यांची संख्या २५-३० टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज शोरूम मालकांनी नोंदवला आहे.नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर पडणे आणि सुकर प्रवास करण्याच्या दृष्टीने दुचाकी खरेदी करण्याकडील कल गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जीवनशैैलीतील बदलांमुळे चारचाकी खरेदी करणाºया ग्राहकांची संख्याही वाढली आहे. सणासुदीच्या काळामध्ये शोरूम मालकांकडून गाड्यांच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट आणि सवलत जाहीर केली जाते.जुनी गाडी देऊन नवीन गाडी खरेदी करा, गाडीच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू, स्क्रॅच कार्ड योजना, मूळ किमतीमध्ये १०-२० टक्के सवलत, दुचाकीच्या खरेदीवर ५ लिटर पेट्रोल भरून मिळेल, फ्री अ‍ॅक्सेसरीज, लकी ड्रॉ, कूपन कोड अशा विविध आकर्षक योजनांमुळे ग्राहक या काळात आॅटोमोबाईल खरेदीलापसंती देतात.आमच्या प्री-ओन्ड कार शोरूममध्ये एक्चेंजमध्ये आलेल्या गाड्या पूर्ण प्रक्रिया करून विकल्या जातात. नवरात्रीच्या काळात या गाड्यांसाठी ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. चौकशीसाठी ग्राहकांचे दररोज फोन येत असतात. दर महिन्याला आमच्याकडे १५० ते २०० गाड्या विकल्या जातात. नवरात्रीमुळे या महिन्यामध्ये २५० गाड्यांची विक्री झाली आहे.- विशाल जाधव, साई र्सिर्व्हसदसरा जवळ आला असल्याने शोरूममध्ये लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. सध्या बाजारात खरेदीसाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. बाईक बरोबरच स्कूटर घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. मध्यमवर्गीय लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत त्याचबरोबर मोलमजुरी करणारे कामगार आणि कर्मचारी वर्ग यांच्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सरकारी कर्मचाºयांना गाडी खरेदीवर १५०० रुपये सवलत आहे तर स्कूटरवर ३००० रुपये सवलत देण्यात आली आहे. गाडी घेतल्यावर ५ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. आता यावेळी १५ ते २० टक्के व्यवसाय वाढला आहे.- नीलेश सोनवणे, शुभ्यान हिरो शोरूम

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७