लक्ष्मण मोरे पुणे : केंद्र शासनाने नागरिकत्व कायदा आणल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. जागोजाग आंदोलने आणि निषेध करण्यासोबतच हा कायदा लागू न करण्याची मागणीही केली जात आहे. पुण्यामध्येही पुरोगामी संघटनांसह मुस्लिम समाजाने आंदोलनाद्वारे आपला निषेध नोंदविला आहे. परंतू, ‘एनआरसी-सीएए’मुळे धास्तावलेल्या मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.केंद्र शासनाने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हा कायदा मंजूर करुन घेतल्यानंतर विविध राज्यांनी त्याविरोधात भूमिका घेतली आहे. सध्या दिल्लीतील शाहिन बागचे आंदोलनही चर्चेचा विषय ठरलेले आहे. देशभरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाने बाहेर पडून आंदोलनात भाग घेतला. पुण्यामध्येही विविध मोर्चे, धरणे आंदोलने झाली. या देशामधून आपल्याला बाहेर जावे लागेल अशी भिती मुस्लिम समाजातील नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा आपल्याकडे शासकीय कागदपत्रं असावीत. आपल्यासह आपल्या नातलगांच्या जन्म आणि मृत्यूचे दाखले आपल्याकडे असावेत यासाठी मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी करायला सुरुवात केली आहे.
एनआरसी-सीएएमुळे धास्तावलेल्या मुस्लिमांची जन्म-मृत्यू कार्यालयात गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:55 PM
केंद्र शासनाने नागरिकत्व कायदा आणल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. पुण्यामध्येही पुरोगामी संघटनांसह मुस्लिम समाजाने आंदोलनाद्वारे आपला निषेध नोंदविला आहे. परंतू, ‘एनआरसी-सीएए’मुळे धास्तावलेल्या मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
ठळक मुद्देमहापालिका हैराण : दाखले मिळविण्याकरिता धांदलकाही जणांची रजिस्टरवर नोंद आढळत नसल्याने वादाचे प्रसंग