विशाल दरगुडे, वडगाव शेरीभामाआसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीला अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे. भूसंपादनामुळे अनेक ठिकाणी कामे रखडली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी उद्या ( सोमवारी ) अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पुणे महापालिकेने केंद्र व राज्य शासनांच्या निधीतून सुमारे ३८० कोंटींची भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना मंजूर केली आहे. त्यासाठी केंद्राकडून ५० टक्के, राज्य शासनाकडून २० टक्के आणि महापालिका ३० टक्के वाटा उचलणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जून २०१४ प्रकल्पाला सुरवात झाली. जून २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. साधारणता भामा आसखेड धरणापासून ४२ किलोमीटर अंतरातून बंदीस्त वहिनीद्वारे २.८ टीएमसी पाणी आणले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी वनविभागाने भूसंपादनास परवानगी दिली. मात्र, खासगी जागेतून जलवाहिनी टाकण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. भूसंपादना अभावी योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. भामा-आसखेड धरणग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा, त्यानंतर प्रकल्प राबवा, अशी भूमिका धरणग्रस्त शेतकऱ्यांनी घेवून जलवाहिनी टाकण्याचे काम बंद पाडले आहे.पवना बंदीस्त जलवाहिनीस तीव्र विरोध झाल्यानंतर भामा-आसखेडमधून पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्प अडचणीत आला आहे.
शेतक-यांच्या विरोधामुळे भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्प अडचणीत
By admin | Published: January 05, 2015 12:16 AM